खेडमध्ये भीषण आग (फोटो- istockphoto)
खेडमध्ये भीषण आगीत घर जळून खाक
संसारोपयोगी वस्तू, कागदपत्रे भस्मसात
तांबे कुटुंबावर कोसळले मोठे आर्थिक संकट
खेड: खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत रशीद तांबे यांचे राहते घर पूर्णपणे भस्मसात झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने संपूर्ण घराला वेढा घातला. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र घरातील संसारोपयोगी वस्तू, फर्निचर, कपडे, कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
तांबे कुटुंबावर कोसळले मोठे आर्थिक संकट
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. रविवारी मध्यरात्रीपर्यंत नागरिक आणि अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी झटत होते. आगीची तीव्रता मोठी असल्याने घरातील बहुतांश सामान वाचवता आले नाही.
दिल्लीत पुन्हा आगीचं तांडव, शेख सराईतील इमारत आगीत जळून खाक; भीषण घटनेचा Video Viral
या भीषण आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली आहे. या घटनेमुळे तांबे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आगीमागील नेमके कारण काय, याचा शोध घेण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
दिल्लीत पुन्हा आगीचं तांडव
सोशल मिडियावर दिल्लीतील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. घटनेविषयी बोलणं केलं तर, गुरुवारी दिल्लीतील शेख सराय परिसरातील जुन्या प्राधिकरण इमारतीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनेस्थळी दाखल झाल्या. सध्या युद्धपातळीवर अग्निशमन आणि बचाव कार्य सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आजूबाजूचा परिसर सुरक्षित केला जात आहे. ही आग लवकरात लवकर विझावी आणि आणखी वाढू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत.
Ambernath Fire: अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात; एक नव्हे तर तब्बल…
नैऋत्य दिल्लीतील मटियाला परिसरातील मासळी बाजाराजवळील एका झोपडपट्टीत भीषण आग लागली असून, त्यात किमान ८० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दिल्ली अग्निशमन दलाच्या म्हणण्यानुसार, बुधवारी रात्री ११.५४ वाजता झोपडपट्टी आणि लगतच्या भंगार गोदामांमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.






