कासव संवर्धन (फोटो- istockphoto)
कासव संवर्धनामध्ये गुहागर अग्रेसर
१७ जानेवारीपासून पिल्लांचा जन्मोत्सव सुरु होणार
कासवाच्या अंड्यांचे कांदळवन विभागाकडून संरक्षण
गुहागर: गतवर्षांतील कासव पिल्लांच्या अंड्यांच्या संरक्षणाबरोचरच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कासव संवर्धनामध्ये गुहागर समुद्रकिनारा अग्रेसर आहे. येथे कासव पिल्लांचा जन्मदर अधिक असून गुहागरमध्ये आतापर्यंत १.४९८ कासव अंड्यांचे संरक्षण करण्यात आले आहे यामुळे यावर्षी १७ जानेवारीपासून कासव पिल्लांचा जन्मोत्सव सुरु होणार आहे. गुहागर समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवाच्या अंड्यांचे कांदळवन विभागाकडून संरक्षण करण्यात येते. गतवर्षी समुद्रकिनारी ३४२ घरट्यांमध्ये ३३.१५९ अंड्यांचे संरक्षण देण्यात आले होते. त्यामधून २२,२६१ कासव पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. गुहागर समुद्रकिना-याबरोबर तवसाळ व रोहिले समुद्रकिनारीही ५६ पाठ्यामधून ५.२८७जेंडाचे सरक्षण करण्यात आले. त्यामधून २.९९८ पिलले बाहेर आली होती आतापर्यंत १३ घरट्यांमध्ये १,४१८ अंड्याचे संरक्षण करण्यात आले.
यंदा सर्वाधिक अंड्यांची शक्यता
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सहा ठिकाणी कसब अंडी संरक्षण केंद्र उभारण्यात आली असून पाच्या संरक्षणासाठी ११ कासवमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. तवसाळ, रोहले व वेळणेश्वर येथे प्रत्येकी एक कासव अडी संरक्षण केंद्र तयार करण्यात जाते असून त्या ठिकाणी प्रत्येकी दोन कासवमित्र नियुक्त करण्यात आले आहेत.
टॅगिंग केलेले कासव वर्षभराने पुन्हा अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारी
कासव महोत्सवाबाबत कांदळवन विभागाने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कासव संवर्धनामध्ये गुहागर समुद्रकिनारा अग्रेसर आहे. यापूर्वी वेळास हे ठिकाणी कासव संवर्धन व कासव महोत्सव उपक्रम राबवण्यात पुढे होते आणि आजही आहे गेली काही वर्षे गुहागर समुद्रकिनारा कासव संवर्धन व कासवांच्या जन्माबाबत सर्वात पुढे आहे. यामुळे कांदळवन विभागाने मुहागरमध्ये कासव महोत्सव भरविण्याबाबत योग्य नियोजन करावे, अशी मागणी शहरवासीयातर्फे होत आहे, वर्षभराने पुन्हा कासव अंडी घालण्यासाठी समुद्रकिनारी गुहागर समुद्रकिनारी कांदळवन अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे वनविभागाचे वनरक्षक तसेच कासबमित्र अतिशय बारकाईने कासव संवर्धनायावत निरीक्षण करत आहेत.
कासव वर्षभराच्या आत गुहागर किनारी आल्याची नोंद
समुद्रकिनारी येणाऱ्या प्रत्येक कासवांची अंडी सरक्षित झाली पाहिजेत, यासाठी कासवमित्र सतर्क आहेत यामुळे गतवर्षी ३१ जानेवारी रोजी १११०९, ११११० पा नंबरने टॅगिग केलेले कासय ८ जानेवारी रात्री ११.३० वा. पुन्हा गुहागर समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येते, कासवमित्र तसेच वनरक्षकांनी टॅगिग व त्याची नोंद कायम ठेवल्याने समुद्रकिनारी येणाऱ्या प्रत्येक कासवांचे निरीक्षण केले जात आहे. यातून गुहागर समुद्रकिनारी अंडी घालण्यासाठी येणारे करसव इतर कोठे न जाता ते पुन्हा याच ठिकाणी येतात, हे स्पष्ट होत आहे. तर हे कासव वर्षभराच्या आत गुहागर समुद्रकिनारी आल्याची नौद यानिमित झाल्याचे वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड यांनी सांगितले.






