रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्टी पासून पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. शनिवार रविवार दोन दिवस येणाऱ्या सुट्ट्या यावेळीही पर्यटकांची मोठी गर्दी कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरती होऊ लागली आहे. पोलीस प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व जीवरक्षक यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत खोल समुद्रात जाण्याचा मोह न आवरल्याने अलीकडे दुर्दैवी घटनांचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी अशीच एक दुर्दैवी मोठी घटना घडली असून समुद्रात तीनजण बुडाले होते यावेळी स्थानिक नागरिक व वॉटर स्पोर्ट्सच्या मदतीने दोघांना सुखरूप वाचवण्यात यश आलं. मात्र दुर्दैवाने एका 25 वर्षीय युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) असं मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
रत्नागिरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे समुद्रात शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीन तरुण समुद्रात उतरले होते. यामध्ये हे तिघेही पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याची घटना घडली वाचवण्यासाठी त्यांचा आरडाओरडा ऐकून मोरया वॉटर स्पोर्ट यांच्या जेटस्की बोटीवरील व्यावसायिकांनी तात्काळ धाव घेत तात्काळ तिघांना पाण्याबाहेर काढले. यातील अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. विकास विजय पालशर्मा (२४) आणि मंदार दीपक पाटील (२४, दोघेही रा. भिवंडी) यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
समुद्र किनाऱ्यावर तैनात असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यवसायिक व जीवरक्षकांनी प्रसंगावधान राखून वाचवले. तातडीने तिघांनाही गणपतीपुळे देवस्थानच्या अॅम्बुलन्सने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी अमोल ठाकरे याला मृत घोषित केले. ही घटना शनिवार 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिराच्या सुमारास घडली. सध्या पर्यटकांची मोठी गर्दी समुद्रकिनारी आहे. घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. समुद्रकिनाऱ्यावर पोलीस प्रशासनाकडून, स्थानिकांकडून व वजीवरक्षकांकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याने या घटना वारंवार घडू लागल्या आहेत.
ठाणे भिवंडी परिसरातून एकूण सहाजण गणपतीपुळे येथील देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या ग्रुपने या परिसरात पर्यटनाचा आनंद घेत गणपतीचे दर्शनही घेतलं आनंदाने फोटोसेशनही केलं होतं त्यानंतर समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी यातील तीन ते चार जण समुद्रात गेले होते,त्याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. मृत्यू झालेला अमोल गोविंद ठाकरे हा भिवंडी परिसर येथे खाजगी नोकरी करत होता. त्याच्या दुर्देवी मृत्यूने मित्रपरिवार व ठाकरे कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमोल याच्या पश्चात आई-वडील, बहिण असा परिवार आहे. या सगळ्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यासाठी आहे.
Ans: पर्यटक अनेकदा पोलीस, स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून समुद्राच्या खोल भागात जातात. अनुभव नसल्याने पाण्याचा अंदाज चुकतो आणि अपघात होतात.
Ans: ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे समुद्रकिनारी घडली.
Ans: विकास विजय पालशर्मा आणि मंदार दीपक पाटील दोघेही भिवंडीचे रहिवासी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.






