Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“एकमेकांवर धडकणारी क्षेपणास्त्रे, जहाजांवर होणारे हल्ले अन्…”, कॅप्टन राहुल उसगावकर यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील आपल्या गावी आठ दिवसांपूर्वीच परतलेला एका खाजगी कंपनीच्या ऑइल वाहतूक करणाऱ्या जहाजाचा कॅप्टन असलेला कोकणसुपुत्र राहुल उसगावकर यांनी अनुभन सांगितला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 23, 2026 | 01:53 PM
"एकमेकांवर धडकणारी क्षेपणास्त्रे, जहाजांवर होणारे हल्ले अन्...", कॅप्टन राहुल उसगावकर यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

"एकमेकांवर धडकणारी क्षेपणास्त्रे, जहाजांवर होणारे हल्ले अन्...", कॅप्टन राहुल उसगावकर यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • समोरच्या जहाजावर हल्ला झाला आणि चर्र झालं
  • आकाशातून उडणारी मिसाईल्स ड्रोन्सचे हल्ले
  • स्टेट ऑफ हॉरम्यूज मधून परतलेला कॅप्टन राहुल उसगावकर
चिपळूण : आजूबाजूला आकाशातून उडणारी युद्धातील मिसाईल्स…आजूबाजूच्या जहाजांवर होणारे हल्ले… आकाशातून उडणारे अंतर्गत ड्रोन हल्ले… स्टेट ऑफ हॉरम्यूजमध्ये अनुभवलेला युद्धाचा थरार, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराण युद्धाच्या थराराचा, कोकणचा सुपुत्र राहुल उसगावकरने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. या सगळ्या मोठ्या जीवघेण्या थरारक मोठ्या बाका प्रसंगांमधून दैव बलवत्तर म्हणून सुखरूप कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील आपल्या गावी आठ दिवसांपूर्वीच परतलेला एका खाजगी कंपनीच्या ऑइल वाहतूक करणाऱ्या जहाजाचा कॅप्टन असलेला कोकणसुपुत्र राहुल उसगावकर यांनी अनुभन सांगितला आहे. इतक्या सगळ्या धोकादायक युद्धजन्य परिस्थितीतून राहुल सुखरूप परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील आई-वडील पत्नी यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे

25 फेब्रुवारीला हे युद्ध सुरू झालं आणि दुर्दैवाने आम्ही 25 फेब्रुवारीलाच स्टेट ऑफ हॉरम्यूज मधून पर्शियन गल्फ मध्ये आम्ही एन्ट्री केली त्याच ठिकाणी आम्ही एक महिना होतो. पण त्या एक महिन्यामध्ये खूप काही अंगावर काटा आणणारे भीतीदायक प्रसंग आम्ही अनुभवले. या सगळ्यांमध्ये स्वतःच्या जीवाची भीती तसंच आमच्या 28- 29 जणांच्या स्टाफ ची काळजी घेणे हा सगळा प्रसंग होता. 88 हजार मॅट्रिक टन इतका अति ज्वलनशील असलेला डिझेल कार्गो आमच्या कंपनीच्या जहाजात होत.

War Update: अमेरिकन लष्करप्रमुखांनंतर नौदलप्रमुखांचीही पडली विकेट; Andrew Hug यांच्या ‘या’ VIRAL VIDEOमध्ये ‘US’ची गुपितं उघड

अशातच आजूबाजूने वरून आकाशातून जाणारी मिसाईल्स एकमेकांना धडकणारी मिसाईल त्यांचा खाली येणारा धोकादायक डेब्रिज हे सगळं आम्ही पाहत होतो. या सगळ्या प्रसंगात नक्की काय करावे हे कळत नव्हते सगळीच परिस्थिती तणावपूर्ण होती. शुद्ध पिण्याच्या पाण्याची कमतरता अन्नाची कमतरता पण देवाच्या कृपेने आम्ही तेथून बाहेर पडलो, मात्र तरी कसे परत येऊ याची चिंता होती या सगळ्या प्रसंगात आमचा महिना गेला. जहाजावरून आम्ही दोघं बाहेर पडलो त्यानंतर आमच्या स्टाफ पैकी आणखी आठ जण परतले.

दुबईवरून आम्हाला फ्लाईटने आणलं गेलं, मात्र त्यावेळी सुद्धा आम्ही खाली पाहिलं स्टेट ऑफ हॉरम्यूज पास झाला त्यानंतर आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला.आपण जहाजावर असताना दोन हल्ले अनुभवले ज्या दिवशी आमच शिप ऑपरेशन होणार होत पण आमच्या नशिबाने आणि आमच्या बाजूला असलेल्या जहाजाच्या दुर्दैवाने त्या जहाजाचे ऑपरेशन सकाळी सुरू झाल. मात्र त्याच वेळी एक मानवविरोहित बोट त्या जहाजाला ठोकली मोठा स्फोट झाला आणि आमच्या सगळ्यांच्या काळजातही चर्र झालं…त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. हल्ला झाला ते जहाज होतं सेफ सी विष्णू नावाचे भारतीय कर्मचारी असलेलं जहाज होते.

दुसऱ्या जहाजातील लाईफ बोटद्वारे एका इराकी कर्मचाऱ्याला वाचवले हा पहिला मोठा आला आम्ही पाहिला. त्यानंतर आमचं जहाज घेऊन आम्ही दुबई आलो त्याच वेळेला आमच्या समोर असलेल्या एका जहाजावर मोठ्या अटॅक झाला सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र जहाजाच मोठे नुकसान झालं. हे सगळे हल्ले आणि हे सगळं वातावरण पाहून आमचा स्टाफही घाबरला होता. दिवस रात्र आम्ही कोणीही झोपत नव्हतो इतकं सगळंच भीतीदायक आणि अत्यंत तणावपूर्वक असं वातावरण वातावरण होतं घरी कधी जाऊ कसे सुखरूप राहू हेही माहिती नव्हतं.पर्शियन गल्फ मध्ये या परिसरातील जीपीएस सिस्टमही बंद करण्यात आली होती अशा परिस्थितीत आम्हाला इराक मधून दुबई मध्ये जहाज घेऊन येणार हे थोडसं कठीण होतं मात्र पारंपारिक दिशादर्शक पद्धती वापरून काही रेफरन्स पॉईंट वापरून थोडं धाडस दाखवून आम्ही दुबईपर्यंत आलो. या सगळ्यामध्ये माझा जहाजावरील स्टाफ, व्यवस्थापन आमच्यामध्ये असलेल्या उत्तम समन्वय व सहकार्य त्यामुळे आम्हाला हे शक्य झालं.

जहाजाचा कॅप्टन असताना ही सगळी परिस्थिती कशी काय हाताळली यावर राहुल याने सांगितलं की, आपण यापूर्वी घेतलेले प्रशिक्षण, वाचलेले पुस्तक आणि जीवनाचे काही ध्येय घेऊन आपण चाललो आहोत हा मराठी बाणा हा मला यावेळी उपयोगाला आला माझं कॅप्टन म्हणून एकच काम होतं की आपल्या क्रू ला सगळे चित्र स्पष्टपणे दाखवणे, आम्हाला अनलिमिटेड इंटरनेट फॅसिलिटी कंपनीने दिली होती त्यांचे मनोरंजन कसं होईल व सगळ्या कर्मचाऱ्यांना सतत बिझी ठेवणं हे काम आपण केलं आणि म्हणून आपण जहाजावर ही सगळी परिस्थिती हाताळू शकलो असं राहुल यान नमूद केल.मी जहाजावरून निघायचं ठरवलं मला कृ चेंज करायला येणारी माणसं वातावरण खराब असल्यामुळे दोन दिवस उशिरा आली जहाजावरून शिडीवरून उतरणे हे धोकादायक असतं पण उत्तम प्रशिक्षण व अनुभव यामुळे आपण जहाजावरून उतरलो त्यानंतर मला पाण्यातूनच पाच तासाचा बोट प्रवास होता.या सगळ्या युद्धपूर्ण वातावरणात अनेक जहाजे आजही अडकून आहेत यामध्ये आपल्या देशाची जवळपास 80 टक्के जहाज असू शकतात. स्टेट ऑफ हाॅरम्यूज फार मोठा एरिया फार मोठा नाही 30 नॉटिकल माईल इतकी त्याची लांबी आहे.जास्तीत जास्त दहा तासात हा टप्पा पार करता येतो जवळपास 60 टक्के ऑइल उद्योग याच समुद्रध्वनीतून होतो अशी माहिती अनुभवी असलेल्या राहुल उसगावकर यांनी दिली.

US Iran Peace Talks : युद्ध थांबणार? इस्लामाबादमध्ये पुन्हा रंगणार अमेरिका-इराण शांतता चर्चा, ट्रम्प ७२ तासांत घेणार मोठा निर्णय

Web Title: Captain rahul usgaonkar thrilling experience returning from hormuz fearing missiles ship attacks and drones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • international news
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

War Deaths : इराण युद्धाचा भारतावर कहर! अमेरिका-इस्रायलपेक्षा अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू, अहवालामुळे खळबळ
1

War Deaths : इराण युद्धाचा भारतावर कहर! अमेरिका-इस्रायलपेक्षा अधिक भारतीय कामगारांचा मृत्यू, अहवालामुळे खळबळ

US-Iran Peace Talks: शांतता चर्चेला इराणने का दिले ‘Minab 168’ नाव? ट्रम्प यांच्या एका धमकीने स्वित्झर्लंड बैठकीत वातावरण तापले
2

US-Iran Peace Talks: शांतता चर्चेला इराणने का दिले ‘Minab 168’ नाव? ट्रम्प यांच्या एका धमकीने स्वित्झर्लंड बैठकीत वातावरण तापले

US-Iran Talks: अमेरिका-इराण चर्चेची पहिली फेरी पूर्ण; 60 दिवसांत अंतिम निर्णय; कतार अन् पाकिस्तानने सांगितली आतली बातमी
3

US-Iran Talks: अमेरिका-इराण चर्चेची पहिली फेरी पूर्ण; 60 दिवसांत अंतिम निर्णय; कतार अन् पाकिस्तानने सांगितली आतली बातमी

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला
4

Gold Price Drop: सोन्याची किंमत ₹15,000 ने घसरली… युद्धाच्या काळात सोन्याचे भाव का वाढतात? इराण-अमेरिका करारानंतर दिलासा मिळाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.