US Iran Peace Talks : युद्ध थांबणार? इस्लामाबादमध्ये पुन्हा रंगणार अमेरिका-इराण शांतता चर्चा, ट्रम्प ७२ तासांत घेणार मोठा निर्णय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतानुसार, येत्या ७२ तासांत अमेरिका इराण (Iran) दुसऱ्यांदा शांतता चर्चेच्या टेबलावर येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी २२ एप्रिल रोजी समाप्त झालेली शस्त्रसंधी देखील वाढवली आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धबंदी अनिश्चित काशळासाठी वाढवल्याची घोषणा त्यांनी केली होती. इराणमधील राजकीय अस्थिरता पाहता हा निर्णय घेण्यात आला होता. ट्रम्प यांनी इराणला शांततेचा ठोस प्रस्ताव करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिल्याचे अमेरिकेच्या व्हाईट हाउसने म्हटले होते.
व्हाईट हाउसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी इराण संघर्षाबाबत बोलताना म्हटले की, अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला शांततेचा ठोस प्रस्ताव सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. यानंतर त्या प्रस्तावर चर्चा आणि विचार करायचा की नाही, युद्धविराम लागू करायचा का नाही हे अध्यक्ष ट्रम्पच ठरवणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
लेविट यांनी हेही स्पष्ट केले की, सध्या इराणवर अमेरिकेने कडक नौदल नाकेबंदी आणि ऑपरेशन इकॉनॉमिर फ्युरी अंतर्गत आर्थिक निर्बंध लागू केले आहेत. तसेच तोपर्यंत इराणवरील थेट लष्करी कारवाई तात्पुरती स्थगित केली असल्याचे लेविट यांनी सांगितले.
दरम्यान अमेरिकेचे शिष्टमंडळ उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप इराणकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यापूर्वी दोन दिवस आधी होणारी चर्चा पुढे ढकलण्यात आली होती. इराणने अमेरिका त्यांच्या जहाजांची नाकेबंदी थांबवत नाही तोपर्यंत चर्चा शक्य नसल्याचे म्हटले होते.
एकीकडे ट्रम्प यांनी चर्चेची केलील घोषणा आणि दुसरकीडे इराणकडून अद्याप न मिळालेला प्रतिसाद यामुळे तणावात अनिश्चितता निर्माण झाली आहे. तसेच इराणने होर्मुझ (Hormuz) वरील पकडही घट्ट केली असून जहाजांवर हल्ले सुरु केले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर तेल आणि उर्जा संकट अधिक गडद झाले आहे.
Ans: अमेरिका इराणमधील दुसऱ्या फेरीची शांतता चर्चा ७२ तासांत पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे होणार असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहे. मात्र अद्याप इराणने यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही
Ans: इराणच्या राजकीय अस्थिरतेमुळे आणि इराणला ठोस प्रस्ताव तयार करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी ट्रम्प यांनी अनिश्चित काळासाठी युद्धबंदी वाढवली आहे.
Ans: युद्धबंदी असूनही इराणच्या आर्थिक बंदरगाहला अमेरिकेने ताब्यात घेतले आहे.असे करुन इराणची आर्थिक नाकेबंदीचा डाव ट्रम्प खेळत आहेत.






