
सॉलिड व लिक्विड वेस्टची विल्हेवाट प्रसिद्ध करण्याची मागणी
भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची सरकारकडे मागणी
वारंवार अपघात अन् जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण
गुहागर: परदेशात सक्तीने बंद करून न्यायालयीन कारवाईनंतर तुरुंगाची शिक्षा झालेली रासायनिक कंपनी तेथील सर्व जुन्या यंत्रसामुग्रीसह भारतामधील कायद्यांचा दुरुपयोग करून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंजुरी दिलेल्या सर्व रासायनिक व अन्य कंपन्यांची माहिती वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावी, अशी मागणी भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे. ते. पुढे म्हणाले, दाभोळखाडी व लोटे औद्योगिक क्षेत्र, सावित्री नदी खाडी व महाड औद्योगिक क्षेत्र या सर्व भागात असणाऱ्या विविध रासायनिक कंपन्यांबद्दल अनेकांना भीती वाटू लागली आहे.
सॉलिड व लिक्विड वेस्टची विल्हेवाट प्रसिद्ध व्हावी…
ज्या राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंजुरी दिली आहे, त्याच प्रदूषण नियंत्रण मेहाच्य अधिका-यांमार्फत पुन्हा तपासणी सुरू आहे. अनेक कंपन्या उत्पादनाचा एक दाखला घेतात व नंतरच्या काळात उत्पादन जरी बदलले तरी सर्व व्यवस्थेसह हा विषय कोणालाही माहिती न होता सुरू राहतो, मोठा अपघात झाल्यावर काही काळ याची चर्चा, चौकशी होते, या सर्व विषयामध्ये रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील विविध रासायनिक औद्योगिक व अन्य कधी देण्यात आले, यामध्ये कोणात्या उत्पादनाला परवानगी, सध्या सर्व कारखान्यात कोणते उत्पादन घेलले जात आहे व हे तपासणी करणारे अधिकारी कोण, परवानग्या कोणकोणत्या व बाहेर पडणारे सॉलिड वेस्ट व लिक्विड वेस्ट याची विल्हेवाट कशी लावली जाते, याबाबत जाहीर प्रकटन शासनाच्या विविध विभागामार्फत वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात यावे, असे ते म्हणाले.
Ratnagiri : मिटेनी कंपनीचा वाद मिटता मिटेना; राज्य प्रदूषण नियंत्रण पथक रत्नागिरीत दाखल
दर ३ महिन्यांनी सुधारित माहिती बंधनकारक
जनतेच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील व प्रशासन कोणताही विषय लपवून ठेवत नाही, याबाबत नागरिकांना सुरक्षितता येईल. रत्नागिरी रापगड जी वर्तमानपत्रे प्रसिद्ध होतात. त्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये शासनामार्फत प्रसिद्धी करण्यात यावी व शासनाच्या संकेतस्थळावर याबाबत दर तीन महिन्यांनी सुधारित माहिती देणे बंधनकारक करावे, अशी मागणी जनतेमधून होत आहे.
Ratnagiri News: नदीपात्रात रासायनिक पाणी सोडणे महागात पडणार; ८ उद्योगांवर कारवाई न झाल्यास…
वारंवार अपघात; जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण
लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये बॉयलरचे स्फोट होणे, रसायन अंगावर उडणे असे वारंवार अनेक अपघातही होत असतात, यातील अनेक अपघातांची नोंदही केली जात नाही. या सर्व विषयामुळे जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.