Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : 19 मित्रांची ट्रिप अन् घात…! गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती

Ratnagiri News Marathi : रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दुर्दैवी घटना घडली असून संभाजीनगर येथील पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भरतीच्या लाटा आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात पर्यटक अडकल्यानंतर पोलिस, लाइफगार्ड आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने शोध व बचाव मोहीम सुरू केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 20, 2026 | 02:36 PM
19 मित्रांची ट्रिप अन् घात...! गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; संभाजीनगरचे पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती

19 मित्रांची ट्रिप अन् घात...! गणपतीपुळे समुद्रकिनारी दुर्दैवी घटना; संभाजीनगरचे पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती

Follow Us
Follow Us:
  • गणपतीपुळे समुद्रकिनारी संभाजीनगरमधील पाच पर्यटक बुडाले
  • युद्धपातळीवर शोधकार्य सुरू
  • भरतीच्या लाटा आणि पाण्याच्या जोरदार प्रवाह
Ganpatipule Beach Accident News Marathi : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे समुद्रकिनारा येथे दुर्दैवी घटना घडली असून संभाजीनगर येथील पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने तात्काळ बचाव व शोधमोहीम सुरू केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून एकूण १९ जणांचा एक मोठा गट शनिवारच्या सुट्टीनिमित्त गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आला होता. सकाळच्या सुमारास या गटातील काही पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर गेले आणि पाण्यात उतरले. मात्र, याच वेळी समुद्रात अचानक वाढलेल्या लाटांचा आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज पर्यटकांना आला नाही. त्यामुळे त्यातील पाच जण वेगाने खोल पाण्याकडे वाहून गेले आणि काही क्षणांतच पाण्याच्या प्रवाहात नजरेआड झाले. यानंतर आरडाओरडा होताच स्थानिक नागरिक, बचाव पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासन, लाइफगार्ड आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. बुडालेल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू असून बोटी आणि अन्य साधनांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.

Chiplun News: ‘चिपळूणातील भाजपचे हे कार्यालय आगामी काळात बनेल सत्ताकेंद्र’; प्रमोद जठार

या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आणि धोकादायक भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. शोधमोहिमेची अधिकृत माहिती आणि बुडालेल्या पर्यटकांची ओळख प्रशासनाकडून जाहीर झाल्यानंतर पुढील तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.

प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल या गंभीर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी तातडीने गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली किनारी भागात आणि समुद्रात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सध्या गणपतीपुळे परिसरात आणि पर्यटकांमध्ये कमालीची हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

बेपत्ता असलेल्या पर्यटकांची नावे
1. आदित्य राऊत
2. यश कांबळे
3. अनिकेत हिवराळे
4. प्रेम आदमाने
5. आनंद नरवडे

या पाचही तरुणांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे.

नदीतील गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचोरी? अस्तान येथील कामावर शिवसेना तालुकाप्रमुखांचा गंभीर आरोप; चौकशीची मागणी

Web Title: Ganpatipule beach incident five tourists from sambhajinagar feared drowned search operation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • Sambhajinagar

संबंधित बातम्या

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण
1

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण

Ratnagiri News: रत्नागिरीच्या किनारपट्टी विकासासाठी ८५.८४ कोटी! पायाभूत सुविधांचा कायापालट
2

Ratnagiri News: रत्नागिरीच्या किनारपट्टी विकासासाठी ८५.८४ कोटी! पायाभूत सुविधांचा कायापालट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.