Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विघ्नहर्त्या दुष्काळ दूर कर’! अंगारकीला गणपतीपुळ्यात भाविकांचे ‘श्रीं’च्या चरणी साकडे

Ratnagiri: सन २०२६ या वर्षात तब्बल तीन वेळा अंगारकी चतुर्थीचा योग आला असून गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या विशेष पर्वणीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात हजेरी लावून श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यास सुरुवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2026 | 03:29 PM
Ganpatipule Temple

Ganpatipule Temple

Follow Us
Follow Us:
  • गणपतीपुळेत श्रींना भक्तांचे दुष्काळ मुक्तीचे गाऱ्हाणे
  • दुष्काळ आणि पितृपंधरवड्याचाही बसला फटका
  • भाविकांच्या संख्येत ४० टक्क्यांनी घट
रत्नागिरी: अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मंगळवारी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. चालू वर्षातील ही तिसरी अंगारकी चतुर्थी असल्याने धार्मिक दृष्टीने या योगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. परंतु, सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि सुरू असलेला पितृपंधरवडा या दुहेरी कारणांमुळे नेहमीच्या तुलनेत भाविकांच्या संख्येत ३५ ते ४० टक्के घट झाल्याचे दिसून आले.

सन २०२६ या वर्षात तब्बल तीन वेळा अंगारकी चतुर्थीचा योग आला असून गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या विशेष पर्वणीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात हजेरी लावून श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यास सुरुवात केली. राज्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि महाराष्ट्र समृद्ध व संकटमुक्त व्हावा, असे साकड़े अनेक भाविकांनी श्रींच्या चरणी घातले.

Ganpatipule News: अंगारकी चतुर्थीनिमित्त ५० हजारहून अधिक भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

३९ दर्शनरांगांची आखणी

दर अंगारकीला श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे अलोट गर्दी उसळते, मात्र या वेळी भाविकांच्या संख्येत घट नोंदवली गेली. मंदिर देवस्थान प्रशासनाकडून भाविकांसाठी दर्शनाचे चोख नियोजन करण्यात आले होते आणि मंदिर परिसरात तब्बल ३९ दर्शन रांगाची आखणी करण्यात आली होती. चालू वर्षातील तीन अंगारकीचे योग संपल्यानंतर आता पुढील अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी भाविकाना काही महिने वाट पहावी लागणार आहे. पुढील अंगारकीचा योग बेट १९ महिन्यांनंतर म्हणजेच २२ जून २०२७ रोजी येणार आहे. त्यामुळे भाविकांना या विशेष पर्वणीसाठी आता पुढच्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत श्रीचे आशीर्वाद घेतले.

महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, ही प्रार्थना
गणपतीपुळे मंदिर देवस्थानचे मुख्य पुजारी अमित धनवटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवस्थान प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्वतोपरी सज्जता ठेवली होती. मात्र, सध्याच्या हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने उभे ठाकलेले दुष्काळाचे सावट, नुकताच झालेला गणेशोत्सव आणि सध्या सुरू असलेला पितृपंधरवडा या सर्वांचा एकत्रित परिणाम भाविकांच्या उपस्थितीवर जाणवला.

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

या अंगारकीला भाविकांच्या संख्येत ३५ ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. ‘बाप्पाला आता एकच साकडे आहे की, पर्जन्यवृष्टी समाधानकारक होऊ दे आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे’, अशी प्रार्थना मुख्य पुजाऱ्यांनी श्रीच्या चरणी केली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा आणि नागरिक संकटात असल्याने मंदिरातही पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.

Web Title: Ganpatipule temple devotees demand to solve drought issue in maharashtra angaraki chaturthi ratnagiri tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • ratnagiri news
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
1

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
2

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Ratnagiri: कुस्तीच्या मैदानात युवा मल्लांची ताकद! रत्नागिरीतील शालेय कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पाणीकपातीमुळे शहरातील बांधकामांवर निर्बंध ! ४३ तालुके दुसऱ्या टप्यात दुष्काळी…
4

पाणीकपातीमुळे शहरातील बांधकामांवर निर्बंध ! ४३ तालुके दुसऱ्या टप्यात दुष्काळी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.