गणपतीपुळेत ५० हजार भक्तांची हजेरी (फोटो- सोशल मीडिया)
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी
50 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन
मुख्य पुजारी अमित धनवटकर यांच्या हस्ते श्रींची महापूजा
रत्नागिरी: अंगारकी चतुर्थीनिमित्त दिवसभरात सुमारे ५० हजारहून अधिक भाविकांनी श्रींचे (Ratnagiri) दर्शन घेतले. इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्याच अंगारकीला भाविकांची प्रचंड गर्दी होती. सर्वाधिक गदीं कोल्हापूर, सांगली, सातान्यासह बेळगाव मधील लोकांची होती. अंगारकी चतुथीनिमित्त संस्थांनने श्रीदेव गणपतीपुळेच्यावतीने पहाटे साडेतीन वाजता स्वयंभू गणेश मंदिर खुले केले. गणपती मंदिराचे मुख्य पुजारी अमित धनवटकर यांच्या हस्ते श्रींची महापूजा झाली. दर्शनासाठी मंदिर परिसरात दर्शनाची व्यवस्था देवस्थान समितीतर्फे करण्यात आली होती. खास पत्र्याची शेड उभारण्यात आल्यामुळे दिवसभर त्याचा फायदा झाला. गणपतीपुळे ग्रामपंचायतीने संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था सुरळीतठेवण्यात आली होती.
सुरक्षारक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती
पार्किंगची व्यवस्था येथील स्मशानभूमी ठिकाणच्या सागर दर्शन पार्किंगमध्ये करण्यात आली होती. एकूणव मंदीर परिसर व समुद्र चौपाटीवर कुठलाही अनुचित प्रकार व दुर्घटना घडू नये, याकरिता राज्यतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक व पोलिस कर्मवान्यावी नियुक्ती करण्यात आली होती.
पालखी मिरवणुकीत मान्यवरांची उपस्थिती
देवस्थान समितीकडून सायं. ४. ३० वा. गणपती मंदिराच्या प्रदक्षिणामार्ग स्वयंभू श्रींची डोलताशांच्या गजरात वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत व मगलमुर्ती मौस्थाचा जयघोष करीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत देवस्थानचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर व सर्व पंच देवस्थानचे मुख्य पुजारी अमित घनष्टकर, देवस्थानचे कर्मकरी, स्थानिक ग्रामस्थ व भाविक मीठा संख्येने सहभागी झाले होते, या अंगारकी चतुर्थी उत्सवानिमित्त रात्री चंद्रोदयानंतर स्वयंभू श्रीचे मंदिर बंद करण्यात आले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती केली होती.
दगडूशेठ’ गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
नवीन वर्षाला सुरुवात झाली असून नवीन वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे. यानिमित्ताने भाविकांनी गणेश मंदिरामध्ये मोठी गर्दी केली. अनेक गणेश भक्तांनी शहरातील विविध गणपती मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे. पहिल्या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने पुणेकरांनी त्यांचा लाडका बाप्पा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला मोठी गर्दी केली आहे. अगदी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी देखील भक्तांनी दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला गर्दी केली होती.
ओम् गं गणपतये नम :…गणपती बाप्पा मोरया… जय गणेश… मंगलमूर्ती मोरया… अशा गणेश नामाच्या जयघोषाने ‘दगडूशेठ’ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नववर्षातील पहिला अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






