Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारचे कडक पाऊल; हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर होणार ‘ब्लॅकलिस्ट’ची कारवाई

विशेषतः ग्रामीण गृहनिर्माण विभाग, स्वच्छ भारत मिशन आणि रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांचे दोन ते पाच महिन्यांचे मानधन रखडल्याने त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 26, 2026 | 01:01 PM
बिल्डरांनो, पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नकाच; नाहीतर थेट कारवाई होणार

बिल्डरांनो, पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नकाच; नाहीतर थेट कारवाई होणार

Follow Us
Follow Us:

राजापूर : सरकारी विभागांमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न आता गंभीर बनला असून, अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाचा निपटारा करण्यासाठी सतत तगादा लावला जात असताना, दुसरीकडे मात्र हक्काचे मानधन महिनोनमहिने मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

विशेषतः ग्रामीण गृहनिर्माण विभाग, स्वच्छ भारत मिशन आणि रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांचे दोन ते पाच महिन्यांचे मानधन रखडल्याने त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सरकारने आता कंत्राटदारांच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी नियमावली अधिक कडक केली आहे. नवीन नियमांनुसार, कंत्राटदारांना दर महिन्याच्या ७ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांचा पगार करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर कंत्राटदाराने या नियमाचे उल्लंघन केले किंवा पगार देण्यास टाळाटाळ केली, तर संबंधित सरकारी विभाग किंवा नियोक्ता स्वतःहून कर्मचाऱ्यांना पगार अदा करेल. अशा प्रकरणांत दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईसह त्यांना काळ्या यादीत टाकण्याची तरतूद करण्यात आली आहे.

प्रवास भत्ते चार वर्षांपासून थकीत

मिळालेल्या माहितीनुसार, मानधनासोबतच अनेक कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्तेही गेल्या चार वर्षांपासून थकीत आहेत. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, क्लर्क आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना वेळेवर मोबदला मिळत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे. शासनाने केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी वेतन देऊ नये, असेही स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे कंत्राटी आर्थिक केंद्र थांबवून कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याचा सरकारचा मानस आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार

हा नवीन नियम केवळ एका विभागापुरता मर्यादित नसून, सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व संस्थांना लागू होणार आहे. यामध्ये केंद्र सरकारची सर्व मंत्रालये, प्रादेशिक कार्यालये, महावितरणमधील बाह्यस्रोत कर्मचारी, स्वायत्त संस्था आणि राष्ट्रीयीकृत बँकांचाही समावेश आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी महिनाभर वाट पाहावी लागणार नाही, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Satara News : नोटीस बजावूनही बदल नाही; समर्थ मंदिर परिसरात पालिकेचा अखेर बुलडोझर; अतिक्रमणांवर थेट घाव

Web Title: Government takes strict action regarding contract workers salaries negligent contractors face blacklisting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Rajapur News Update

संबंधित बातम्या

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
1

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
2

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
3

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’
4

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.