Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

महाराष्ट्रातील उद्योगधंदे आणि रोजगारनिर्मितीच्या मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील 35,211 खासगी कंपन्या बंद पडल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या गुंतवणुकीच्या दाव्यांवर सवाल उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Aug 14, 2026 | 05:17 PM
‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • पाच वर्षांत महाराष्ट्रातील 35,211 खासगी कंपन्या बंद पडल्याचा दावा
  • मुंबईतील 12,181 कंपन्यांचा समावेश असल्याचे सपकाळ म्हणाले
  • अहिल्यानगरमधील 1,500 एकर जमीन भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयावरही टीका
 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून लाखो रोजगार निर्माण होणार असल्याचा महायुती सरकारचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फेटाळून लावला आहे. राज्यातील उद्योगधंद्यांची सद्यस्थिती पाहता सरकारचे गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीचे दावे प्रत्यक्ष परिस्थितीशी विसंगत असल्याचा आरोप त्यांनी केला.

गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील ३५ हजार २११ खासगी कंपन्या बंद पडल्या, असा दावा सपकाळ यांनी केला. यामध्ये मुंबईतील १२ हजार १८१ कंपन्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई-पुणे-नाशिक औद्योगिक पट्ट्यात कंपन्या बंद होण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“भाजपा महायुती सरकारचे धोरण उद्योगधंद्यांना पोषक नाही”

“महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांची गुतंवणूक झाली व रोजगार निर्मितीही लाखोंच्या संख्येने होणार असल्याचा भाजपा महायुती सरकारचा दावा सपशेल फेल ठरलेला आहे. सरकारचे दावे हे कागदावरच असून भ्रष्टाचार. कमिशनखोरी आणि सत्ताधा-यांच्या बगलबच्च्यांच्या गुंडगिरीमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे बंद पडत आहेत किंवा ते इतर राज्यात स्थलांतर करत आहेत.”

‘उद्योगांबाबत फक्त दावे नको, आकडे जाहीर करा’; रोहित पवारांचा सरकारला सवाल

“गेल्या पाच आर्थिक वर्षांत राज्यातील ३५ हजार २११ खासगी कंपन्या बंद पडल्या आहेत. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील १२ हजार १८१ कंपन्यांचा समावेश आहे,हे अत्यंत धक्कादायक आहे. भाजपा महायुती सरकारचे धोरण उद्योगधंद्यांना पोषक नाही, असेच यातून स्पष्ट होत आहे,” असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात सरकारवर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, “महाराष्ट्रातील किती उद्योग बंद पडले, ही माहिती केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी लोकसभेत एका लेखी उत्तराद्वारे दिली आहे. मुंबई–पुणे–नाशिक पट्ट्यातील कंपन्या बंद होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.”

“सरकारचे आकडेच सरकारची पोलखोल करत आहेत”

“सरकारचे आकडेच सरकारची पोलखोल करत आहेत पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र हे मान्य करताना दिसत नाहीत. शब्दच्छल करून असे झालेले नाही हे सांगण्याचा केविलावाणा प्रयत्न ते करत आहेत. बंद पडलेल्या या कंपन्या डिफंक्ट कंपन्या आहेत असा फडणविसांचा दावा आहे, पण कंपन्या बंद पडल्या, हे सत्य त्यामुळे लपवता येत नाही आणि राज्यातील बेरोजगार तरुणांची वाढती संख्या पाहता गुतंवणूक कुठे झाली व रोजगार निर्मिती कुठे झाली, हा प्रश्न राहतोच. मग सरकार काहीही दावे करो,” असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“सरकार उद्योगाच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार करत सुटले”

“राज्यात एकीकडे उद्योगधंद्यांचा बारा वाजल्या असताना सरकारने अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाची १५०० एकर जमीन एका मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या निबे ग्रुप नावाच्या खासगी कंपनीला अकृषिक वापरासाठी ५० वर्षे भाड्याने दिली आहे. कोणतीही निविदा न काढता ही जमीन खासगी कंपनीच्या घशात घालणे हा भ्रष्टाचारच आहे. अशाच पध्दतीने खुलेआमपणे जमिनी खासगी व्यावसायिकांना दिल्या जात आहेत. त्या जागेवर ना उद्योग उभे राहतात ना रोजगार निर्माण होतात.”

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

“मुंबईतल्या सगळ्या जमिनी विकून झाल्यामुळे सरकार आता ग्रामीण भागाकडे वळले आहे. गडचिरोलीच्या जमिनी खाण माफियांच्या घशात घातल्या आहेतच, आता अहिल्यानगरच्या जमिनी दिल्या जात आहेत. सरकार उद्योगाच्या नावाखाली फक्त जमिनी वाटत, भ्रष्टाचार करत सुटले आहे. महायुती सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा,” असेही असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal maharashtra industries closed companies investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devendra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
1

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’
2

Maharashtra Drought : दुष्काळ जाहीर करण्यात सरकारकडून उशीर; सतेज पाटलांचा गंभीर आरोप, ‘विशेष अधिवेशन बोलवा’

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम
3

Sharad Pawar : ‘आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या’; शरद पवारांचा NDA चर्चेला पूर्णविराम

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’
4

‘साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगवास’; सुवेंदू अधिकारींचा इशारा, म्हणाले- ‘टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.