Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

जालन्यात रेशीम कोष बाजारपेठेचे लोकार्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्याची ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ अशी निर्माण होत असल्याचे सांगितले. ‘जालनाई’ ब्रँडद्वारे स्थानिक सिल्क उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Aug 14, 2026 | 07:11 PM
जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • जालन्याची ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अशी निर्माण करण्याचा प्रयत्न
  • ‘जालनाई’ ब्रँडद्वारे जालना सिल्कला जागतिक बाजारपेठेशी जोडणार
  • रेशीम उत्पादनापासून वस्त्रनिर्मितीपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी उभारणार
 

जालना : जालना जिल्ह्याची ओळख आता ‘सिल्क, सीड आणि स्टील’ अर्थात ‘ट्रिपल एस सिटी’ म्हणून निर्माण होत असून, रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण आणि कोनशिला अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अंबड येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे तसेच सात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नवीन इमारतींचेही लोकार्पण करण्यात आले.

रेशीम शेतीला पर्यायी नगदी पिकाचा पर्याय

कापूस आणि सोयाबीन या पारंपरिक नगदी पिकांवर जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी अवलंबून आहेत. मात्र, शेतकऱ्यांना अतिरिक्त आणि पर्यायी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी रेशीम शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

‘अमित शाह नालायक गृहमंत्री, राजीनामा द्या’; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप, ‘शाह यांनी संसदेत येऊन स्पष्टीकरण द्यावे,’ अशी मागणी

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीही रेशीम शेती फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्पादनापासून ब्रँडिंगपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी

केवळ रेशीम कोष उत्पादनापुरते मर्यादित न राहता त्यापुढे धागानिर्मिती, वस्त्रनिर्मिती, साडी विणकाम, ब्रँडिंग आणि बाजारपेठ अशी संपूर्ण मूल्यसाखळी जालन्यात उभारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जालन्यातील महिलांनी रेशीमपासून साडी विणण्यास सुरुवात केली असून त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळाल्यास रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. शेतकरी, महिला, विणकर, व्यापारी आणि युवकांना या उद्योगाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘जालनाई’ ब्रँडचे अनावरण

जालन्यात तयार होणाऱ्या रेशीम उत्पादनांना स्वतंत्र ओळख मिळावी यासाठी ‘जालनाई’ या ब्रँडची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ‘जालनाई’ ब्रँडच्या लोगोचेही यावेळी अनावरण करण्यात आले.

पैठणीला जशी देश-विदेशात ओळख मिळाली, त्याच धर्तीवर जालना सिल्कलाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Raigad Farmer News : – १,८५९ शेतकऱ्यांना १० कोटी ९५ लाखांची शासनाकडून कर्जमाफी

जालना येथील ड्रायपोर्टमुळे रेशीम उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रेशीम बाजारपेठ आणि ड्रायपोर्ट या दोन्ही सुविधा जालना सिल्कच्या विस्तारासाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे, संजय सावकारे, आमदार बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, संतोष दानवे, नारायण कुचे, हिकमत उढाण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Jalna triple s city silk seed steel cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Jalna
  • jalna news
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
1

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
2

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
4

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.