Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

आतापर्यंतच्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठा बांधवाने पुन्हा आंदोलनात उतरावे. तसेच आजवर आंदोलनापासून दूर राहिलेल्यांनीही आता या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 13, 2026 | 09:27 AM
‘57 लाख नोंदी रद्द करणारे सरकार मोडून काढायचे’; मनोज जरांगेंचा थेट इशारा

‘57 लाख नोंदी रद्द करणारे सरकार मोडून काढायचे’; मनोज जरांगेंचा थेट इशारा

Follow Us
Follow Us:

सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत केलेल्या कथित चुका तातडीने दुरुस्त कराव्यात; अन्यथा आगामी आंदोलनाची तीव्रता सरकारला परवडणार नाही, असा आक्रमक इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी साताऱ्यात दिला.

आतापर्यंतच्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठा बांधवाने पुन्हा आंदोलनात उतरावे. तसेच आजवर आंदोलनापासून दूर राहिलेल्यांनीही आता या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले. “सरकारला ५७ लाख नोंदीही द्यायच्या नाहीत, हा अन्यायही आपल्याला मोडून काढायचा आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनाचा उल्लेख करत जरांगे म्हणाले की, या आंदोलनाबाबत सर्वांच्या भावना विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, आता आंदोलन निर्णायक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या जुन्या कुणबी नोंदींचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. “दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या नोंदी रद्द करण्याची भाषा केली जाते. मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले जाते; मग मुख्यमंत्री काय करतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देताना जरांगे म्हणाले, “तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले आहे. मराठ्यांची प्रमाणपत्रे रद्द केली आहेत, ती पुन्हा द्या. मराठा समाजाची ताकद तुम्हाला लवकरच कळेल.”

मराठा समाजाला ओबीसींच्या आरक्षणातून कोणाचे आरक्षण हिसकावून घेण्याची मागणी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “ओबीसींचे एक टक्काही आरक्षण आम्हाला द्या, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हटलेले नाही. मग ‘कोणाचेही ओरबाडून आरक्षण देणार नाही’ या सरकारच्या वक्तव्याला अर्थ काय?” असा सवाल त्यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील तरुणांवरील गुन्हे मागे घ्यावेत, रद्द झालेली एसीबीसी प्रमाणपत्रे ग्राह्य धरून संबंधित तरुणांना नोकऱ्या द्याव्यात, बार्टी-सारथी योजनांच्या पूर्वीच्या सवलती पुन्हा लागू कराव्यात आणि महसूल विभागाकडून झालेल्या चुका दुरुस्त कराव्यात, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

मला सत्तेत रस नाही

“मला सत्तेत रस नाही. सत्ता त्यांनाच लखलाभ असो. मला फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे आणि त्यासाठीचा हा माझा प्राणांतिक लढा असेल,” असे जरांगे यांनी ठामपणे सांगितले. गाडी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “मी इमानदारीने काम करतोय म्हणून मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मला गाडी देण्यात आली आहे. गाडी आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही.

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग

Web Title: Manoj jarange issues a direct warning to the government over maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Government Decision
  • Maharashtra Government
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य
1

दुष्काळग्रस्त तालुक्यांना राज्य सरकारकडून दिलासा; लवकरच मिळणार मोफत अन्नधान्य

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय
2

प्रसूतिपूर्व लिंगनिदान आणि भ्रूणहत्येला लवकरच लागणार लगाम; राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात घेणार महत्त्वाचा निर्णय

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
3

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका
4

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.