योगेश कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसैनिकांची विराट गर्दी
दापोली /समीर पिंपळकर :विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि संपूर्ण राज्यात बऱ्या अधनि राजकारणाला सुरुवात झाली दापोली मतदार संघात विद्यमान आमदार योगेशदादा कदम यांनी शिवसेनेतून उमेदवारी निश्चित झाल्याने महायुतीतर्फे गुरुवार दि. २४ ऑक्टोबर रोजी भव्य जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री ना. रामदासभाई कदम, प्रदूषण नियंत्रक महामंडळ अध्यक्ष सिध्देश कदम, मातोश्री ज्योती कदम, श्रेयाताई कदम,चंद्रकांत उर्फ अण्णा कदम याच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा-रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीने कोट्यवधींची मालमत्ता हडपली? गणेश बीडकर यांचा गंभीर आरोप
आपल्या नेत्याचा अर्ज भरण्यासाठी गावातून शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते शहरामध्ये दाखल होऊ लागले. दापोलीमधील आझाद मैदान येथे हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शवली. व्यासपिठावरून आमदार योगेशदादा कदम, शिवसेना नेते रामदासभाई कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रितम रुके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष जयवंत जालगावकर, आरपीआयचे तालुका अध्यक्ष राहुल जाधव, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका अध्यक्ष उन्मेश राजे, खेड तालुका अध्यक्ष सचिन धाडवे, मंडणगड तालुका अध्यक्ष प्रताप घोसाळकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. साधना बोत्रे, प्रदेश सरचिटणीस रमा बेलोसे, उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. महायुतीच्या पक्षाची भुमिका स्पष्ट करत आमदार योगेशदादा कदम यांना पुन्हा दापोली मतदार संघात प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला.दापोली आझाद मैदान येथून डोक्यात भगव्या टोप्या, गळ्यात भगवे पट्टे, छातीवर धनुष्यबाणाचे बिल्ले लावून योगेशदादा झिंदाबाद, शिवसेना झिंदाबाद, एकच वादा, पुन्हा आमदार योगेशदादा अशा गगन मेंदी घोषणा देत शिवसैनिकांनी रॅली निघाली आमदार योगेशदादा कदम आपल्या छोट्या रुद्राईला घेऊन व्यासपीठावर उभे होते.
हेही वाचा-Assembly Election 2024 : महाविकास आघाडीचा आता नवा फॉर्म्युला, मित्रपक्षांना काय मिळालं? वाचा सविस्तर
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार योगेश कदम व अन्य मान्यवरांनी पुष्पहार घातला.पत्रकार परिषदेत योगेशदादा कदम म्हणाले की, “आज मला वदनिय बाळासाहेबांची नामनिर्देशन पत्र भरीत असताना आठवण झाली.शिवसेना नेते ना. रामदासमाई कदम यानी मला राजकारणात अखंड साथ दिली आहे आणि म्हणून मी अडीच हजार कोटींच्यावरती विकासकामे करु शकलो. माझी पहिली पाच वर्ष ही मतदार संघातील मुलभूत सुविधा पुरविण्यात गेली मात्र आता पुढील पाच वर्ष मुलभूत सेवेबरोबरच रोजगारनिर्मिती, मोठमोठ्या प्रकल्पाना मंजुरी जाणून येथील एकही तरुण आपला मतदारसंघ सोडून बाहेर जाणार नाही यासाठी प्रयत्नशील राहाणार असून आज नामनिर्देशन पत्र भरताना एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांनी मला साथ दिली आहे त्यामुळे आजची शिवसैनिकाची गर्दी पाहाता ही माझी विजयी मिरवणूकच आहे.” असं त्यांनी यावेळी सांगितले.