महाविकास आघाडीतील घटकपक्ष समाजवादी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५ जागांची मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी केवळ ६ दिवस शिल्लक आहेत. तरीही महाविकास आघाडीत १५ जागांचा तिढा कायम आहे. आज ८५-८५-८५ जागांवर निवडणूक लढण्यावर एकमत असून १८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. २७० जागांवर सहमती झाली असून प्रमुख नेते गुरुवारी मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीची मंगळवारी जागावाटपासंदर्भात बैठक झाली. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर महाविकास आघाडीचं जागावाटपावर एकमत झालं झाल्याचं सांगितलं जात होतं. कॉंग्रेस 108 जागा तर शिवसेना ठाकरे गट 95 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 90-85 जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती होती. मात्र आज पुन्हा बैठक बोलावण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी ८५-८५-८५ जागांवर एकमत झाल्याचं सांगितलं.
‘विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटपं सुरळीत पार पडलं आहे. राज्यातील सर्व जागांचं वाटप पूर्ण झालं आहे. आमची २७० जागांवर सहमती झाली आहे. तर उर्वरित काही जागांवर मित्रपक्षांची चर्चा करणार आहोत. मित्र पक्षांसोबत उद्या बैठक घेणा आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अनिल देसाई, अनिल देशमुख या सर्वांना कायम जागावाटप काय झालं, किती झालं, होतंय की नाही. होणार आहे की नाही, असं सारख विचारलं जात होतं. आता सगळे एकत्र आहोत. अखेरची बैठक शरद पवारांसोबत पार पडली. शरद पवारांनी माध्यमांससोर जागावाटपाची घोषणा करण्यासाठी सांगितलं होतं. काँग्रेस,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, इतर आघाडीतील घटकपक्ष या सगळ्यांना सामावून घेणारं जागावाटप पूर्ण झालं आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
८५-८५-८५ च्या फार्म्युल्यावर सहमती झाली. यादीही तयार केली आहे. उर्वरित जागाबाबात मित्रपक्षांशी करण्यात येणार आहे. . उद्या एकत्र बसू आणि नव्याने चर्चा करू. उर्वरित जागांवर जरी दावा असला तरी तो चर्चा करून सोडवला जाईल. २८८ जागा पूर्ण ताकदीने लढून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येईल, असा विश्वासही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.