Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कब है होली? Kokan Railway ला पडला विसर? शिमगोत्सवाच्या ‘प्लॅनिंग’ वर संताप; 3 दिवस आधीच…

नोकरदारांसाठी एकही सोयीची स्पेशल ट्रेन या नियोजनात दिसत नाही. गुरुवारी सकाळी गाडी सोडल्यास नोकरदारांनी सुट्टी घेऊन जायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 18, 2026 | 03:10 PM
कब है होली? Kokan Railway ला पडला विसर? शिमगोत्सवाच्या ‘प्लॅनिंग’ वर संताप; 3 दिवस आधीच…
Follow Us
Close
Follow Us:

कोकण रेल्वेचे अजब नियोजन
शिमगोत्सवाच्या ‘प्लॅनिंग’ वर संताप
होळीसाठी ३ दिवस आधीच स्पेशल गाड्या

सावंतवाडी: कोकणच्या सर्वांत मोठ्या ‘शिमगोत्सवा‘साठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या जखमेवर रेल्वे प्रशासनाने मीठ चोळले आहे. सोमवारी दि. २ मार्च २०२६ रोजी होळी असताना, रेल्वेने चक्क तीन दिवस आधी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारीलाच स्पेशल गाड्यांचे नियोजन केल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हे नियोजन प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की केवळ कागदोपत्री गाड्या धावण्यासाठी? असा जळजळीत प्रश्न आता विचारला जात आहे.

सोमवारी होळी असताना चाकरमानी साधारणपणे शुक्रवार दि. २७ रोजी रात्री किंवा शनिवारी गावी जाणे पसंत करतात. मात्र, रेल्वेने एलटीटी-सावंतवाडी आणि सीएसएमटी-सावंतवाडी या दोन्ही महत्त्वाच्या गाड्या गुरुवारी दि. २६ फेब्रुवारीलाच सकाळी आणि रात्री सोडल्या आहेत. कामावरून सुटून शुक्रवारी रात्री गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी एकही सोयीची स्पेशल ट्रेन या नियोजनात दिसत नाही. गुरुवारी सकाळी गाडी सोडल्यास नोकरदारांनी सुट्टी घेऊन जायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Kokan Railway: कोकणवासियांसाठी खुशखबर! ‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा

मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणार ‘होळी स्पेशल’

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी रोड (एसडब्ल्यूकी) दरम्यान ‘होळी स्पेशल’ रेल्वेच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०१११९ आणि ०११२० या साप्ताहिक विशेष गाड्या खालीलप्रमाणे धावतील गाडी क्र. ०१११९ (एलटीटी ते सावंतवाडी रोड) दि. २६ फेब्रुवारी आणि दि. ५ मार्च २०२६ वेळ मुंबईहून रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि दुसन्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

Kokan Railway : नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश ; सिंधुदुर्ग आणि कणकवली स्टेशनवर नव्या जलद गाड्यांना थांबा

लोकप्रतिनिधींनो, आता तरी आवाज उठवा !

दि. २ मार्चच्या होळीसाठी दि. २६ फेब्रुवारीला गाड्या सोडणे, हे रेल्वेचे ‘प्लॅनिंग’ प्रवाशांच्या डोक्यावरून जात आहे. कोकणी माणस्राची सहनशीलता पाहून रेल्वे प्रशासन मुद्दाम असे अजब वेळापत्रक लादतेय का?, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. एकीकडे ‘मत्स्यगंधा’ आणि ‘कोकणकन्या यांसारख्या नियमित गाड्या तासनतास उशिराने धावत आहेत, तर दुसरीकडे उत्सवाच्या काळातही अशा प्रकारे नियोजन शून्य स्पेशल गाड्या सोडल्या जात आहेत. माजी खासदारांनी नुकतीच अधिकाऱ्यांची भेट घेतली असली, तरी रेल्वेचे हे ‘गुरुवारी गाडी आणि सोमवारी होळी’ असे व्यस्त गणित सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Kokan railway run special trains before 3 days in holi passengers angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • holi
  • Kokan News
  • kokan railway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.