कोकण रेल्वे (फोटो- सोशल मिडिया)
रविवारपासून होणार वेळापत्रकाची अंमलबजावणी
एर्नाकुलम मरूसागर अजमेर रेल्वेचे केले भव्यस्वागत
जनआंदोलनातून वेधण्यात आले होते लक्ष
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांत ८ मेल-एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. रविवारपासून याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या कोकणवासिय प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे. तर कोकण रेल्वे प्रवासी समन्वय संघटनाकोकण रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर सिंधुदुर्ग या जिल्हा मुख्यालयाच्या स्टेशनवर मरुसागर अजमेर एक्प्रेस गाडीला सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर रेल्वे बोर्डाने मंजूर केल्याप्रमाणे मरूसागर एक्सप्रेस या नव्या गाडीचा पहिल्यांदाच थांबा मिळाल्याने भव्यस्वागत करण्यात आले.
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती आणि सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटना दशकोशीतील सरपंच रेल्वे प्रवासी नागरिक यांच्या वतीने मोटरमन आप्पा कदम, पि. के. सावंत स्टेशन मास्तर गार्ड यांना पुष्पगुच्छ देऊन या रेल्वेगाडीला हार व श्रीफळ वाढवून भव्यस्वागत करण्यात आले.
जनआंदोलनातून वेधले होते लक्ष
कोकणातील प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी सिंधुदुर्ग नगरी हे जिल्हा मुख्यालयाचे मुख्य स्टेशन आणि या स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा द्या, या मागणीबाबत सातत्याने मागण्या, जनआंदोलन उभारून रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातूनही रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, कोकण रेल्वे रिजनल मॅनेजर शैलेश बापट, कोकण रेल्वे बोडॉन सिंधुदुर्ग स्टेशनवर मरूसागर एक्सप्रेस या साप्ताहीक जलद गाडीला थांचा मंजूर केला असून दुपारच्या वेळेत ठीक १२.३४ वाजता मुंबईच्या दिशेने जाणारी ही मरूसागर अजमेर एक्सप्रेस थांबा असून ही गाडी सिधुदूर्ग स्टेशनवर दु. १.२० वा. आली. त्यानंतर स्वागत केले. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि संबंधित समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर, जिल्हा समन्वयक नंदन वैगुर्लेकर, उपाध्यक्ष परशुराम परब, जिल्हा कार्याध्यक्ष शुभम परब, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन संघटना अध्यक्ष आप्पा मांजरेकर, सचिव सुमित सावंत आदी उपस्थित होते.
Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र
थांबे पाहूनच प्रवास करावा
१२९७७/७८ मरूसागर एक्स्प्रेस आणि २२६५५/५६ एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेसला सिंधुदुर्ग स्थानकात दोन मिनिटांचा थांबा दिला आहे.
२२४७५/७६ हिसार-कोइम्बतूर-हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस आणि १६३३५/३६ गांधीधाम-नागरकोईल-गांधीधाम एक्स्प्रेसला कणकवली स्थानकात थांबा दिला आहे. २ ते ११ नोव्हेंबरदरम्यान या थांब्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रवाशांनी रेल्वेगाडीचे आरक्षण करताना सुधारित थांबे पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.






