Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! कोकण अन् पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला? ताम्हिणी घाट बंद अन् ‘लालपरी’ची सेवा ठप्प

ताम्हिणी घाटातील बससेवा अद्याप बंद असून विशेषत: महाड,चिपळून,दापोली गणपतीपुळे या भागात एसटीची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 05:28 PM
मोठी बातमी! कोकण अन् पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला? ताम्हिणी घाट बंद अन् 'लालपरी'ची सेवा ठप्प

मोठी बातमी! कोकण अन् पश्चिम महाराष्ट्राचा संपर्क तुटला? ताम्हिणी घाट बंद अन् 'लालपरी'ची सेवा ठप्प

Follow Us
Follow Us:
  • ताम्हिणी घाटासह खेड तालुक्यातील काही भागातील एसटी सेवा बंद
  • रस्ते खचल्यामुळे बस सेवा बंद 
  • ग्रामीण भागात रस्ते खचले असून पूल पाण्याखाली
पुणे: पुणे विभागात मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसाचा फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेवर झाला आहे.पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत .यामुळे खेड तालुक्यातील  खरपूर, येगवे, निर्मळवाडी, गडद आणि आंबे-हातवीज मुक्कामी बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याशिवाय ताम्हिणी घाटातील बस सेवा अद्याप सुरू झालेली नाही.

खेड तालुक्यातील खचलेले रस्ते आणि पुलावर साचलेले पाणी कमी झाल्यानंतर ही बससेवा पूर्ववत होणार आहे.या भागातील रस्ते इतके खचले आहेत की,त्या मार्गावरून बस वाहतूक करणे शक्य नाही.विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार,खचलेले रस्ते दुरूस्त करण्याची जबाबदारी पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.जितक्या लवकर हे रस्ते दुरूस्त होतील त्यानुसार ही बससेवा पूर्ववत केली जाणार आहे.

ताम्हिणी घाटातील बससेवा अद्याप बंद असून विशेषत: महाड,चिपळून,दापोली गणपतीपुळे या भागात एसटीची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.या मुसळधार पावसाचा फटका एसटी विभागाला आणि प्रवाशांना झालेला आहे.याचा परिणाम मागील आठ दिवसांपासून पुणे एसटी विभागाला दररोज सुमारे ५० ते ६० लाख रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान

रस्त्यांची परिस्थिती सुधारल्यानंतर ज्या भागात एसटी बससेवा बंद आहे,त्या भागात बसेस सोडण्यात येतील.

कमलेश धनराळे,

विभागीय वाहतूक अधिकारी,पुणे एसटी विभाग

‘लालपरी’ला पावसाचा फटका

मुसळधार पावसाचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या उत्पन्नावर झाला आहे. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार या चार दिवसांत पुणे एसटी विभागाच्या उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. पुणे एसटी विभागाला दररोज साधारणतः २ कोटी १० ते २० लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, मागील चार दिवसांपासून हे उत्पन्न घटून १ कोटी ५० लाखांवर आले आहे. म्हणजेच, दररोज ६० ते ७० लाखांनी पुणे एसटी विभागाचे उत्पन्न कमी झाले आहे.

ST Employees Salary : ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवरून सरकारवर निशाणा

सोमवारी पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्यामुळे मुंबई–पुणे एसटी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पुण्याहून मुंबईकडे सकाळी ६ वाजता रवाना झालेल्या बसेस परत बोलावण्यात आल्या. पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई–पुणे महामार्ग बंद असल्याचा सर्वाधिक फटका प्रवासी आणि एसटी महामंडळाला बसला.

Web Title: Due to landslide and heavy rain tamhini ghat closed msrtc st bus closed i khed taluka pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Kokan News
  • msrtc
  • pune news

संबंधित बातम्या

‘तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय चाटायचं का?’ मोशी दुर्घटनेवरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा, 64 तास उलटूनही बचावकार्य सुरूच !
1

‘तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय चाटायचं का?’ मोशी दुर्घटनेवरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा, 64 तास उलटूनही बचावकार्य सुरूच !

संकटाच्या काळात ‘AFMS’ चे वैद्यकीय कवच; ‘एअरबॉर्न हॉस्पिटल’ची तत्पर सेवा
2

संकटाच्या काळात ‘AFMS’ चे वैद्यकीय कवच; ‘एअरबॉर्न हॉस्पिटल’ची तत्पर सेवा

लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’
3

लाखो पाऊले पुण्यात विसावली! शनिवारवाडा ते लक्ष्मी रोड; अवघी पुण्यनगरी झाली ‘वारकरीमय’

माळीण दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्त? ७२ पैकी २८ गावांचे पुनर्वसन प्रस्ताव प्रलंबित; मावळ दुर्घटनेनंतर प्रश्न ऐरणीवर
4

माळीण दुर्घटनेनंतरही प्रशासन सुस्त? ७२ पैकी २८ गावांचे पुनर्वसन प्रस्ताव प्रलंबित; मावळ दुर्घटनेनंतर प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.