सिंधुदुर्गनगरी : रेल्वे बोर्डाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार, कोकणातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना गाड्यांना थांबा देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीमध्ये रेल्वे मंत्रालयाने प्रयोगात्मक तत्त्वावर सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रेल्वे बोर्डाकडून १७ ऑक्टोबररोजीआदेश जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय लागू करण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले असून रेल्वेने सिंधुदुर्ग व कणकवली बस स्थानकावर मागणीप्रमाणे गाड्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी, सिंधुदुर्ग हजरत निजामुद्दीन अजमेर मरु सागरआणि कणकवली स्टेशनवर कोयंबतूर , गांधीग्राम नागर कोईल याचार गाड्यांना थांबा, दिला जाणार आहे. यायामुळेपालकमंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न यशआले असून कोकणात आणिकोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही दिवाळी भेट च मिळाल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना धन्यवाद दिले जात आहेत.सिंधुदुर्ग स्थानकावर एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. कणकवली स्थानकावर हिसार – कोयंबतूर एक्सप्रेस आणि गांधिधाम – नागरकोइल एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाने स्थानिक स्तरावर तिकिट विक्रीवर लक्ष ठेवण्याचे, व या गाड्यांच्या वेळेबाबत प्रवाशांना योग्य ती माहिती मिळावी यासाठी या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी देण्याचे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोकण रेल्वे कोकणच्या माणसाची आहे. यामुळे त्याचा लाभ कोकणला मिळाला पाहिजे या हेतूने नितेश राणे यांनी गेल्या महिन्यांमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आणि सातत्याने जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सिंधुदुर्ग कणकवली वैभववाडी यास काही स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा मिळावा अशी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीने सातत्याने मागणी लावून धरली होती. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. त्यानुसार पालकमंत्री नितेश राणे यांनीरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिलेल्या मागणी निवेदनात या रेल्वे गाड्यांना कोकणात थांबे मिळाले पाहिजेत, म्हणून प्रयत्नशील होते. अखेर त्याला यश आले असून रेल्वे प्रवाशातून आनंद व्यक्त होत आहे.कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीच्या मागण्यांना काही अंशी यश येत आहे त्यामुळे प्रवासी समन्वय संघर्ष समितीने पालकमंत्र्यांना शुभेच्छा धन्यवाद दिले आहे.