
कोकण रेल्वेमार्गावर असणार 'मेगाब्लॉक'
तर याचा प्रवासी वेळापत्रकावरती कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मेगाब्लॉक वा कोणताही परिणाम वाहतुकीवर होणार नसल्याने हा मेगा ब्लॉक घेताना कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देत, मंठी खबरदारी घेतली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील रायगड जिलाातील माणगाव, इंदापूर बायपास गेली कित्येक वर्षे रसातला आहे.
त्यावेळी माणगाव इंदापूर परिसरात मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना तसेच मुंबईकडून कोकणात व गोव्याकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनांना सुट्टीच्या कालावधीत वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तासंतास या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करण्यात तब्बल २ ते ३ तासांचा वेळही जाती व त्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरतो. पण आता हा बायपास पूर्ण करण्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून गती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व कोकण रेल्वे प्रशासन यांच्यातील समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर ब्लॉक घेताना मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. या कालावधीत या ठिकाणावरून कोणतीही प्रवासी गाडी धावत नसल्याने याचा कोणताही परिणाम प्रवासी वेळापत्रकावरती आलेला नाही या बायपासवर असलेल्या कोकण रेल्वे ट्रॅक वरून जाणाऱ्या या उड्डाणपुलासाठी गर्डर चढवण्याचे महत्त्वाचे जोखमीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता अधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित ठेकेदार कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे.
यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाचे अभियंता तांत्रिक विभागातील अधिकारी कर्मचारी महामार्ग प्राधिकरण अभियंता व कर्मचारी यांचे पथक आदी आवश्यक ती सगळी यंत्रणा संबंधित ठिकाणी तैनात असणार आहे, हे जोखमीचे काम अत्यंत सुरळीत पार पाडावे यासाठी कोकण रेल्वे प्रशासन व राष्ट्रीय मार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अभियंता यांची संयुक्त बैठक झाल्याचीही सभांची माहिती आहे