Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘कोणाची तरी सुपारी घेऊन, असे…’; ऑडिओ क्लिपवरून योगेश कदमांचा आरोप

Maharashtra Politics: शिवसेना नेत्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिपच्या आधारे मुख्यमंत्र्यांवर बेछूट आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. या सर्व प्रकारामागे शंभर टक्के राजकीय षडयंत्र आणि गलिच्छ राजकारण दडलेले स्पष्टपणे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 23, 2026 | 03:17 PM
कथित ऑडिओ क्लिपने राजकारण तापले

कथित ऑडिओ क्लिपने राजकारण तापले

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील सुपारी घेऊन बोलत आहेत – योगेश कदम
  • योगेश कदम यांचा आरोप; ऑडिओ क्लिपवरून नवीन वाद
  • राज्याच्या राजकारणात नव्या वादाला फुटले तोंड 
रत्नागिरी/Maharashtra Politics: मराठा आरक्षणाच्या मुद्दधावरून राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या एका ऑडिओ क्लिपवरून नवीन वाद निर्माण झाला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन त्रयस्थ व्यक्ती आपापसात संवाद साधत असून त्याचा कोणताही भक्कम पुरावा उपलब्ध नाही. शिवसेना नेत्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिपच्या आधारे मुख्यमंत्र्यांवर बेछूट आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे.

या सर्व प्रकारामागे शंभर टक्के राजकीय षडयंत्र आणि गलिच्छ राजकारण दडलेले स्पष्टपणे दिसून येत आहे. मनोज जरांगे हे स्वतःच्या मनाचे न बोलता कोणाची तरी सुपारी घेऊन, असे वक्तव्य करत असल्याचा गंभीर आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केला. या संपूर्ण प्रकरणात मराठा समाजाच्या हिताचा कोणताही विचार केलेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले.

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : जरांगेंची क्लिप AI ने बनवली? अब्दुल सत्तारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

शिंदे यांचे कार्य मोलाचे…

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रामाणिक आणि महत्वपूर्ण प्रयत्न केले होते, त्यांनी दिलेले आरक्षण कोर्टातही टिकवून दाखवले. त्यामुळे मराठा समाजाच्या दृष्टीने त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. अशा लोकनेत्यावर सातत्याने टीका करताना आणि खोटे आरोप करताना मनीज जरागे यांना लाज वाटली पाहिजे, कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय ऑडिओ क्लिप सादर करून राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी मानला जात आहेजरांगे यांनी यापूर्वी निर्माण केलेली आपली स्वतःची विश्वासार्हता आणि पातकी आता स्वतःच खाली आणली आहे.

महायुतीतील ऐक्य अबाधित
राजकीय स्वार्थासाठी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वापर केला जात असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. मराठा समाजाच्या हितापेक्षा राजकीय आकासापोटी है आरोप केले जात असल्याचा घणाघात मंत्री योगेश कदम यानी केला आहे. या ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर महायुतीमध्ये वाद निर्माण करण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विचारले गेले, त्यावर बोलताना कदम म्हणाले, या राजकीय आरोपांचा महायुतीच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही.

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष अत्यंत मजबूतीने आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षांत राज्यात अत्यंत प्रभावी काम केले आहे. पूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी त्यांना पूर्ण साथ दिली होती, तर आता शिंदे याच्यासोबत फडणवीस खंबीरपणे उभे आहेत. अशा प्रकारे परस्परांना साथ देत महायुतीचे सर्व नेते राज्याला पुढे नेण्याचे काम करत आहेत. एका व्यक्तीने अशा प्रकारची नाहक आणि बेछूट वक्तव्ये केल्याने महायुतीमधील वातावरण अजिबात खराब होणार नाही, असे मंत्री कदम म्हणाले,

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Minister yogesh kadam allegations to manoj jarange patil eknath shinde audio clip ratnagiri news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Manoj Jarange Patil
  • ratnagiri news
  • Yogesh Kadam

संबंधित बातम्या

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप
1

Ramdas Kadam Targets BJP: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपकडून षडयंत्र, रामदास कदमांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : जरांगेंची क्लिप AI ने बनवली? अब्दुल सत्तारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
2

Manoj Jarange Patil Audio Clip Controversy : जरांगेंची क्लिप AI ने बनवली? अब्दुल सत्तारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर
3

Manoj Jarange Patil: महायुतीत ठिणगी! मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या दाव्याने राजकारण तापलं; शिंदेसेनेने भाजपला धरलं धारेवर

Manoj Jarange Audio Clip Controversy : ऑडिओ क्लिपची SIT चौकशी होणार? शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, फडणवीसांनी दिला शब्द
4

Manoj Jarange Audio Clip Controversy : ऑडिओ क्लिपची SIT चौकशी होणार? शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, फडणवीसांनी दिला शब्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.