Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard News: CCTV मध्ये धडकी भरवणारे दृश्य! घराभोवती बिबट्याच्या फेऱ्या, रात्री घराबाहेर पडायचं कसं? गुहागरच्या काजळी गावात थरार

Leopard News: गुहागर-विजापूर महामार्गालगत असलेल्या काजळी गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक रहिवासी दर्शन चव्हाण यांच्या घराच्या आवारात मध्यरात्री बिबट्या तासनतास फेऱ्या मारत असल्याचे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 05, 2026 | 12:04 PM
CCTV मध्ये धडकी भरवणारे दृश्य! घराभोवती बिबट्याच्या फेऱ्या, रात्री घराबाहेर पडायचं कसं? गुहागरच्या काजळी गावात थरार

CCTV मध्ये धडकी भरवणारे दृश्य! घराभोवती बिबट्याच्या फेऱ्या, रात्री घराबाहेर पडायचं कसं? गुहागरच्या काजळी गावात थरार

Follow Us
Follow Us:
  • घरात फक्त तीन महिला अन् दारात तासनतास बिबट्याचा पहारा!
  • गुहागरच्या काजळी गावात थरार
  • रात्री घराबाहेर पडायचं कसं?
Leopard News: घराभोवती किंवा परिसरात बिबट्याचा वावर असणे ही अत्यंत चिंताजनक आणि भीतीदायक परिस्थिती आहे. अशीच एक घटना रत्नागिरीतील गुहागर तालुक्यातून समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात असलेल्या काजळी गावात बिबट्याच्या (Leopard News) वावरामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. गुहागर-विजापूर महामार्गालगत असलेल्या या गावातील एका घराच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर होत असल्याची घटना समोर आली आहे. या बिबट्याच्या हालचाली घराबाहेर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाल्याने कुटुंबासह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दर एक-दोन दिवसांनी घराभोवती फेऱ्या

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवासी दर्शन चव्हाण यांच्या घराच्या आवारात मध्यरात्री बिबट्या येत असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार एखाद-दुसऱ्या रात्रीपुरता मर्यादित नसून दर एक-दोन दिवसांच्या अंतराने बिबट्याचा वावर दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळा तो घराच्या परिसरात बराच वेळ फिरत असल्याचे CCTV मध्ये कैद झाले आहे. चव्हाण यांनी सुरक्षेच्या दृष्टीने घरात CCTV कॅमेरे बसवले होते. त्यानंतर रात्रीच्या वेळी घराच्या अगदी जवळ बिबट्याचा वावर सुरू असल्याचा प्रकार समोर आला.

Chandrapur News: रेल्वेच्या धडकेत नर बिबट्याचा मृत्यू; बल्लारशाह-काजीपेठ मार्गावर वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

घरात केवळ तीन महिला

या घटनेतील सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे दर्शन चव्हाण यांच्या घरात सध्या केवळ तीन महिला राहत आहेत. त्यापैकी एका महिलेची प्रकृती सातत्याने बिघडत असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रात्री अचानक औषधांची गरज भासल्यास किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास घराबाहेर पडायचे कसे, असा गंभीर प्रश्न कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. घराच्या दारापर्यंत बिबट्याचा वावर असल्याने रात्री बाहेर पडताना जीव मुठीत घेण्याची वेळ या महिलांवर आली आहे.

गणेशोत्सवामुळे चिंता आणखी वाढली

कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे.तसेच गणेशोत्सव हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत आरती, भजन आणि जागरणाचे कार्यक्रम सुरू असतात. ग्रामस्थ एकमेकांच्या घरी आरतीसाठी जातात. त्यामुळे रात्री गावातील नागरिकांची ये-जा ही मोठ्या प्रमाणात असते.

अशा परिस्थितीत गावाच्या परिसरात बिबट्याचा नियमित वावर सुरू असल्याने ग्रामस्थांची चिंता आणखी वाढली आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी

बिबट्याकडून कोणावर हल्ला होण्याची किंवा जीवितहानी होण्याची घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गुहागर वन विभागाने परिसराची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी आणि गरज असल्यास बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी दर्शन चव्हाण आणि काजळी ग्रामस्थांनी केली आहे.

आता ग्रामस्थांच्या मागणीची वन विभागाकडून कशी दखल घेतली जाते आणि बिबट्याच्या वावरावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडे काजळी गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Matheran Leopard News : माथेरानमध्ये बिबट्याची दहशत; हनिमून पॉईंटजवळ पाळीव कुत्र्याची शिकार, घटना CCTV मध्ये कैद

Web Title: Leopard news terror in kajali village guhagar three women trapped at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Leopard

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदीचा ‘ट्रेंड’! शाडूच्या मूर्तीं, पूजा साहित्या अन्…
2

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदीचा ‘ट्रेंड’! शाडूच्या मूर्तीं, पूजा साहित्या अन्…

Ganesh Chaturthi Business Ideas : गणपती बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय! ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी
3

Ganesh Chaturthi Business Ideas : गणपती बाप्पाच्या आगमनासोबत करा नवे व्यवसाय! ‘या’ गोष्टींची बाजारात वाढते मागणी

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?
4

Ganeshotsav 2026: गणेशमूर्तीच्या सोंडेची दिशा काय सांगते? उजव्या सोंडेच्या बाप्पाच्या पूजेत का पाळतात कडक नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.