
मनुष्यबळाची कमतरता तरीही भातशेतीची ओढ कायम
अनेक शेतजमिनी पडल्या ओसाड
काही ठिकाणी काम पोहोचले अंतिम टप्प्यात
संगमेश्वर: पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे पूर्वी दहा खंडी भात पिकवणारा शेतकरी आज खंडीभर शेतीवर आला असला, तरी शेतीची गोडी मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या मनातून गेलेली नाही. एकेकाळी शेतीपासून दूर जाताना दिसणारी तरुण पिढी आता पुन्हा पारंपरिक भातशेतीत रमलेली दिसत आहे. कोरोनाच्या काळात गावातील शेतीचे महत्त्व अधोरेखित झाले आणि त्यामुळेच नेमकेपणाने तरुणांना शेतीची खरी गरज उमगली. संगमेश्वर तालुक्यात सध्या शेतीचा हंगाम जोमात सुरू असून शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतलेला आहे. वर्षभर पुरेल इतके धान्य दरवर्षी आपल्या शेतात पिकवण्याची परंपरा अनेक शेतकरी आजही जपताना दिसतात. भातशेतीची हीच ओढ आता तरुण पिढीपत पोहोचल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.
अनेक शेतजमिनी ओसाड तर काही ठिकाणी शेवटच्या टप्यात
शेताच्या बांधावर सकाळची न्याहारी, दुपारचे पंगतीतील जेवण आणि दिवसभर चिखलात भात लावणी असे पारंपरिक दृश्य पुन्हा जिवंत झाले आहे. पूर्वी शेतीच्या कामाला पारंपरिक ‘भलोरी’ गाण्यांचा ठेवा असायचा, ज्यामुळे कामाला रंग बढ़ायचा. मात्र जुन्या पिढीतील शेतकरी कमी झाल्याने ही गाणी आता मोजक्याच ठिकाणी ऐकू येत आहेत, यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही ठिकाणी भात पिके रुजली नाहीत, त्यामुळे अनेक शेतजमिनी ओरखंड दिसत असून काही ठिकाणी शेती शेवटच्या टप्यात आहे.
Purandar News: शेतकरी महिलांनी केली राईस मिल कंपनीची पायाभरणी; ‘उमेद’च्या माध्यमातून…
सध्या ग्रामीण भागातील शेतकरी कवळ तोडणीच्या कामात गुंतलेले दिसत असून शेतीची कामे टप्याटण्याने केली जात आहेत शिमगोत्सवाच्या काळात शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी व्यस्त असतो, ही पारंपरिक पद्धत आजही अनेक गावांत टिकून आहे. बदलत्या काळात अडचणी वाढल्या असल्या, तरी शेतीशी नातं तोडण्याऐवजी त्याला नव्याने जपण्याचा प्रयत्न शेतकरी आणि तरुण पिढी करत असल्याचे चित्र संगमेश्वर तालुक्यात स्पष्टपणे दिसून येत आहे.
“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
शेतकरी महिलांनी केली राईस मिल कंपनीची पायाभरणी
पुरंदर तालुक्याचा दक्षिण भाग पुरंदरचा कोकण म्हणून प्रसिद्ध आहे. बहुतेक परिसर डोंगरी आणि वनराईने नटलेला आहे. याच परिसरात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आतापर्यंत भात काढणी झाल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी इतर ठिकाणी घेवून जावे लागत होते. आता या भागातील शेतकरी महिलांनी एकत्रित येवून राईस मिलची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असून या प्रकल्पाचे नुकतेच भूमिपूजन झाले आहे. थोड्याच दिवसात प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झालेली पाहायला मिळणार आहे.