Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागाचे आव्हान पेलत महावितरणचे यश; प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टी, भूस्खलन आणि ३३ केव्ही वीजवाहिन्यांवर झाडे कोसळल्याने मंडणगड व दापोली तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. प्रतिकूल हवामान, डोंगराळ भाग आणि घनदाट जंगलातील आव्हानांवर मात करत महावितरणच्या अभियंते, कर्मचारी व कंत्राटदारांनी युद्धपातळीवर काम करून काही तासांतच वीजपुरवठा सुरळीत केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 06, 2026 | 06:03 PM
मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागाचे आव्हान पेलत महावितरणचे यश; प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत

मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागाचे आव्हान पेलत महावितरणचे यश; प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत

Follow Us
Follow Us:
  • भूस्खलन, पडझडीतही महावितरणची तत्पर सेवा
  • मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा पूर्ववत
  • मुसळधार पाऊस आणि डोंगराळ भागाचे आव्हान पेलत महावितरणचे यश
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, झाडे कोसळणे आणि वीजवाहिन्यांचे नुकसान झाल्याने मंडणगड आणि दापोली तालुक्यात शुक्रवारी (3 जुलै 2026) वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणच्या अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदारांनी युद्धपातळीवर काम करून काही तासांतच वीजपुरवठा पूर्ववत केला.

भूस्खलनामुळे वीजखांब कोसळले, झाडामुळे दुसरी वीजवाहिनी बंद

दस्तुरी–मंडणगड ३३ केव्ही वीजवाहिनीवर भूस्खलनामुळे काही वीजखांब कोसळले. त्याचवेळी दस्तुरी–विसापूर ३३ केव्ही वीजवाहिनीवर घनदाट जंगलात मोठे झाड कोसळल्याने दोन्ही मुख्य वीजवाहिन्यांमध्ये गंभीर बिघाड झाला. परिणामी मंडणगड आणि दापोली तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.

Neelam Gorhe on Mumbai Rain: मुंबईत पावसामुळे १२ जणांचा मृत्यू; नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले दुःख, म्हणाल्या…

जीव धोक्यात घालून शोधला बिघाड

घटनेची माहिती मिळताच महावितरणची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दस्तुरी–विसापूर वीजवाहिनी घनदाट जंगल आणि डोंगराळ भागातून जात असल्याने मुसळधार पावसात कर्मचारी पायी चालत पेट्रोलिंग करत बिघाडाचे ठिकाण शोधण्यासाठी गेले. प्रतिकूल हवामान, चिखल आणि निसरड्या वाटांवरून मार्ग काढत त्यांनी वीजवाहिनी दुरुस्त केली आणि पुरवठा सुरू केला.

युद्धपातळीवर उभारले नवीन वीजखांब

दस्तुरी–मंडणगड वीजवाहिनीवरील भूस्खलनामुळे कोसळलेले वीजखांब बदलण्याचे कामही तातडीने सुरू करण्यात आले. कार्यकारी अभियंता (खेड) आणि उपकार्यकारी अभियंता (मंडणगड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले.

अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदारांनी समन्वयाने काम करत नवीन वीजखांब उभारले आणि वीजवाहिनी पूर्ववत केली. त्यामुळे सायंकाळपर्यंत मंडणगड तालुका आणि दापोलीतील प्रभावित गावांमध्ये वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.

रात्रीही सुरू राहिले दुरुस्तीचे काम

दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी मंडणगड–केरीळ ३३ केव्ही वीजवाहिनीमध्येही जंगल परिसरात बिघाड झाला. बाणकोट आणि देव्हारे शाखेतील कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसात काम करत हा बिघाडही दूर केला. त्यामुळे किनारपट्टी भागातील वीजपुरवठाही रात्रीच पूर्ववत करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सातत्याने मार्गदर्शन

या संपूर्ण आपत्कालीन कामकाजादरम्यान रत्नागिरी मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव आणि रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले.

महावितरणच्या मंडणगड, कुंबळे, पालगड, बाणकोट, देव्हारे आणि केळशी शाखांतील अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार तसेच स्थानिक सहकाऱ्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अल्पावधीत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. या कामगिरीमुळे प्रभावित भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

Web Title: Mahavitaran restores power supply in mandangad dapoli after heavy rain landslide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • Dapoli
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

सावधान! मधमाशांची घटती संख्या ठरतेय धोक्याची घंटा; शेतीच्या उत्पन्नावर होतोय थेट परिणाम
1

सावधान! मधमाशांची घटती संख्या ठरतेय धोक्याची घंटा; शेतीच्या उत्पन्नावर होतोय थेट परिणाम

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी
2

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.