
कोकणात निवडणुकीचा रणसंग्राम सुरू
आमदार भास्कर जाधवांच्या नेतृत्वात लढणार निवडणूक
विनायक राऊत यांचे स्पष्ट आदेश
गुहागर: गुहागर विधानसभामतदारसंघातील गुहागर, चिपळूण व खेड तालुक्यातील तीनही पंचायत समिती जिंकणार असल्याचा आत्मविश्वास गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. गुहागर तहसिल येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केले. यावेळी आमदार जाधव बोलत होते. सर्वसाधारण कोकणात कुणबी, मराठा समाज मोठा असून त्यांना ९० टक्के जागा दिल्या जातात.
मात्र, इतर समाजाला १४ पैकी ११ जागासुध्दा दिल्या आहेत. कारण बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याची शिकवण आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिलीआहे. अलिकडे विरोधकांनी उमेदवार पळवणे, नेते पळविणे, लोकप्रतिनिधी पळविणे, ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी करणे, आणि आता फक्त पैशाचा महापूर मतदारसंघामध्ये निर्माण करुन निवडणुका जिंकायच्या असा नवा फंडा काढला आहे, आमच्याकडे पैसा नसला तरी जनशक्ती आहे. त्यामुळे धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी लढत होणार असून माझ्या मतदारसंघातील तीनही पंचायत समित्या जिंकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई? आगामी निवडणुका जाधवांच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिल्याने…
कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई?
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर चिपळूणमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची राजकीय दिशा स्पष्ट झाली असून, ही निवडणूक पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल, असे ठाम निर्देश पक्षाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या जाधव-राऊत अंतर्गत वादावर तूर्तास पडदा पडल्याचे चित्र दिसत आहे. सोमवारी बिपळुणातील अतिथी हॉटेलच्या सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी शिवसेना उबाठा गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
पक्षाला मोठा फटका
९ जिप, १८ पस गणांसाठी उमेदवारांची निवड या निवडणुकीत महाविकास आघाडी व्यवी, अशी सुरुवातीपासूनच इच्छा होती व त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र अंतिम निर्णय येत्या काळातच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, विशेष महणजे, नगरपालिका निवडणुकीदस्यान आ. भास्कर जाधव व माजी खासदार विनायक राऊत यांचे स्वतंत्र गट निर्माण झाल्याचे स्पष्टचित्र होते, त्याचा मोठा फटका पक्षाला बसला. मात्र, आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आ. भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखालीच लढवाव्यात, अस स्पष्ट आदेश दिल्यांनतर आता पक्षांतर्गत वाद संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.