
सिकंदर कोण होणार? याकडे वळले सर्वांचे लक्ष
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्वतंत्र
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठामध्ये फारकत
चिपळूण: चिपळूण नगरपरिषदेसाठी चांगलीच रणधमाळी गाजत असून महायुती की महाविकास आघाडी या संदर्भात चर्चाना पेव फुटले असतांना शिवसेना-भाजपा युती झाल्याचे समोर आले तर महाविकास आघाडी निवडणुकीमध्ये पुरती दुभंगली आहे. त्यातच शिवसेना उबाठामध्ये देखील दुफळी माजली आहे. काँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. एकंदरीत चिपळूण नगर परिषदेची दिवसेंदिवस रंगतदार बनत जाणार आहे. या सर्व घडामोडी कोण ‘सिकंदर’ होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एका जागेच्या नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी १२९ उमेदवार आपले नशीब अजमवणार आहेत. महाराष्ट्रातील सत्तेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपरिषद नगरपंचायत निवडणूकीमध्ये महायुती, महाविकास आघाडी होईल, अशी अटकळ कार्यकर्त्यांमध्ये होती. मात्र, कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे सध्याचे राजकीय परिस्थितीवरून लक्षात येत आहे.
शिवसेना उबाठात दोन गट पडल्याच्या चर्चांना उधाण
एकंदरीत सेनेतली अंतर्गत गटबाजी अक्षरशः चव्हाट्याव आली असल्याने पक्षांतर्गत संघर्षांची चिन्हे आता स्पष्टपण दिसू लागली आहेत. शिवसेना उबाठा पक्षातील राजकीन खेळीमध्ये शिवसेना उबाठा गटात सध्यातरी पक्षाचे ने आ. भास्कर जाधव व माजी खासदार विनायक राऊन असे दोन गट पडले असल्याची राजकीय वर्तुळा जोरदारपणे चर्चा सुरू आहे. याचबरोबर महाविकार आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षामध् देखील दुफळी माजली असल्याचे समोर येत आहे एकंदरीत या राजकीय घडामोडी पाहता काँग्रेसमध्ये शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे, एवढे नक्की!
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्वतंत्र
शिवसेना-भाजपा युती तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरला आहे. मात्र, या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराने नगराध्यक्ष पदाचे उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. तर दुसरीकडे महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी आमदार रमेश कदम यांनी सुरुवातीपासूनच आपण नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात युतीत ‘पॅचअप’, चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली
तसेच काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी देखील आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक रिंगणात येणार असल्याचे जाहीर करून टाकले. तरीही महाविकास आघाडी व्हावी, या दृष्टीने चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. मात्र, यात यश आले नाही, तर दुसरीकडे शिवसेना-उबाठा एकत्र येण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी शिवसेना उबाठा पक्षातील नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक बहुसंख्येने उपस्थित होते. यामुळे शिवसेना उबाठा एकत्र येतील, अशी अटकळ बांधली गेली.