Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shimga Festival: कोकणवासींयासाठी खुशखबर! शिमगोत्सवासाठी धावणार ‘ही’ स्पेशल मेमू Train

होळी आणि शिमग्यासाठी मोठ्य संख्येने कोकणात प्रवास करतात. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 गाड्या सुरु करणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 27, 2026 | 02:39 PM
Shimga Festival: कोकणवासींयासाठी खुशखबर! शिमगोत्सवासाठी धावणार ‘ही’ स्पेशल मेमू Train
Follow Us
Follow Us:

गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय
मडगाव-एलटीटी स्पेशलही धावणार १ मार्चपासून
पहिल्या दोन होळी स्पेशल सेवेत दाखल

खेड: शिमगोत्सवात होळी स्पेशल गाड्यांना होणारी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मेमू स्पेशल १ ते ८ मार्च या कालावधीत धावणार आहे. दिवा-चिपळूण मेमू स्पेशल दिवा येथून रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या सकाळी ६.३० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात चिपळूण येथून ३.३० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री ११.१० वाजता दिवा येथे पोहचेल. स्पेशलला निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापेवामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी स्थानकात थांबे आहेत.

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

मडगाव -एलटीटी स्पेशलही धावणार १ मार्चपासून

कोकण मार्गावर शिमगोत्सवासाठी मडगाव एलटीटी आरक्षित स्पेशल १ मार्चपासून धावणार आहे. ८ मार्चपर्यंत धावणारी स्पेशल मडगाव येथून सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता एलटीटीला पोहचेल. परतीला एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १०.४० वाजता मडगावला पोहचेल. २० डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, चिविम, करमाळी स्थानकात थांबेल.

शिमगोत्सवासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या सीएसएमटी-सावंतवाडीसह एलटीटी-सावंतवाडी या पहिल्या दोन होळी स्पेशल २६ फेब्रुवारीपासून कोकणवासियांच्या सेवेत दाखल झाली आहेत. स्पेशलच्या ४ फेऱ्या धावणार असल्याने गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. सीएसएमटी-सावंतवाडी साप्ताहिक होळी स्पेशल २६ फेब्रुवारी आणि ६ मार्च दरम्यान धावेल. सीएसएमटीहून रात्री १२.३० वाजता सुटणारी स्पेशल त्यादिवशी सकाळी १२.३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल, परतीला सावंतवाडीवरून सायंकाळी ५.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल, स्पेशलला २२ डबे जोडण्यात येणार आहेत.

Pune-Nashik Railwayचा मार्ग बदलणार! GMRT ‘बफर झोन’मुळे केंद्र सरकारचा मूळ आराखड्याला नकार

कोकणवासियांसाठी खूशखबर!

होळी आणि शिमग्यासाठी मोठ्य संख्येने कोकणात प्रवास करतात. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 गाड्या सुरु करणार आहेत. त्यापैकी 94 ट्रेन होळीसाठी विशेष असतील आणि 94 नियमित ट्रेन असतील. या विशेष गाड्यांसाठी तिकीट बुकिंग १८ फेब्रुवारीपासून झाली आहे.

Web Title: Kokan railway diva to chiplun special memu train run fo shimga festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Chiplun
  • holi 2026
  • kokan railway

संबंधित बातम्या

Navarashtra Impact : चिवेली ग्रामीण पेयजल योजना वादात; तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाची सुनावणी, अनेक अधिकारी राहणार हजर
1

Navarashtra Impact : चिवेली ग्रामीण पेयजल योजना वादात; तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाची सुनावणी, अनेक अधिकारी राहणार हजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.