चिपळूण नगरपरिषद (फोटो- सोशल मिडिया)
रत्नागिरीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर
चिपळुणमध्ये ‘महाविकास’ फुटली
बंडखोरी संपुष्टात, युती मजबूत, उबाठापुढे आव्हान
रत्नागिरी: जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवश जिल्ह्याचे राजकारण पूर्णपणे ढवळू निघाले आहे. एका बाजूला महायुती (सेना-भाजप) मधील घटक पक्षांमध पॅचअप झाले आहे. मधील बंडखोरी मोठ्या प्रमाणात संपुष्टात आल्याने युती मजबूत झाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कॉन जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी चिपळूण खेड मधील युतीमधील पॅचआ करण्यात पालकमंत्री उदय सामंत आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त दुसरीकडे महाविकास आघाड (मविआ) मात्र रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये विस्कळीत झाली आहे रत्नागिरी आणि चिपळूण मधील महाविकास आघाडीला ग्रहण लागल असून आघाडीतील काँग्रेस तसेच शख् पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष स्वतंत्रपण निवडणुकीत उतरले आहेत. रत्नागि नगर परिषदेसाठी आघाडी होती फुटल्याने आता उबाठाच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आव्हान उभे ठाकले आहे.
रत्नागिरीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत जागा वाटप होऊनही ‘उबाठा’ (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या बंडखोर उमेदवारांनी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध भरलेले अर्ज माघारी घेतले नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही पक्ष आता एकत्र निवडणूक लढवणार असून त्यांनी महाविकास आघाडीत सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले.
चिपळुणमध्ये ‘मविआ’ फुटली
चिपळूणमध्ये शिंदे गट-भाजपाची युती झाली. आ. शेखर निकम यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंतांशी चर्चेअंती नगराध्यक्ष पदासाठी भाजपने आपला अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीत मात्र फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस हे पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
अन्य महत्त्वाच्या ठिकाणचे चित्र
राजापूर नगरपरिषदः नगराध्यक्ष पदासाठी एका उमेदवारासह एकूण ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असून, एकूण ५४ उमेदवार (नगराध्यक्ष ३. नगरसेवक ५१) निवडणूक रिंगणात आहेत. देवरुख नगरपंचायतः ९ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी ५ आणि नगरसेवक पदासाठी ६५ असे एकूण ७० उमेदवार १८ जागांसाठी निवडणूक लढवणार आहेत.






