Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurga News: ‘प्रोजेक्ट संजीवनी अॅम्ब्युलन्स’चा शुभारंभ, निलेश राणे म्हणाले, “सुरेश प्रभू हे…’

निवडणुकीच्या काळात प्रा. मधु दंडवते आणि खासदार नारायण राणे यांच्यासोबतही माझे मतभेद नव्हते. आज आमदार निलेश राणे यांच्याशीही कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत,असे प्रभू म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2026 | 06:36 PM
Sindhudurga News: ‘प्रोजेक्ट संजीवनी अॅम्ब्युलन्स’चा शुभारंभ, निलेश राणे म्हणाले, “सुरेश प्रभू हे…’
Follow Us
Follow Us:

सुरेश प्रभू हे कोकणचे बावनकशी सोने
सिंधुदुर्गात ‘प्रोजेक्ट संजीवनी अॅम्ब्युलन्स’चा शुभारंभ
केवळ विकासासाठी काम करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी: देशात आणि लंडनसारख्या परदेशात काम करूनही सुरेश प्रभू यांचे लक्ष सातत्याने कोकणच्या मातीवर आहे. कोकणाने अनेक रत्न दिल्ली, त्यात सुरेश प्रभू हे कोकणचे बावनकशी सोनं आहेत. त्यांचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. गेली ३० वर्षे लोकाप्रतिनिधी म्हणून आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते सिंधुदुर्गच्या ग्रामीण जनतेची सेवा करत आहेत. देशात अनेक भारतरत्न होऊन गेले, पण सुरेश प्रभूनी कोकणचे नाव दिल्लीच्या राजकारणात उंचावले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केंद्रातून नवनवीन उपक्रम आणावेत, त्यासाठी आमचे सदैव सहकार्य राहील, असा मनोदय आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. मानव संसाधन विकास संस्थेच्या वतीने ग्रामीण जनतेच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट संजीवनी अॅम्ब्युलन्स’ चा शुभारंभ कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, गोव्याचे उद्योगपती अनिल खवटे, सीए सुनील सौदागर, सदाशिव ओगले, जी.टी. राणे, संजय सावंत, डॉ. शरद सावंत, योगेश प्रभू, जनशिक्षणचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, माजी जि.प. अध्यक्ष काका कुडाळकर, रत्नागिरीचे माजी जि.प. अध्यक्ष सुभाष बने, नितीन सावंत, मोहन सावंत, अणावचे सरपंच लीलाधर आणावकर, भाजपा सरचिटणीस प्रसन्न देसाई, सावळाराम आणावकर, विलास हडकर यांच्यासह संस्थेचे विश्वस्त, ग्रामस्थ आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. शरद सावंत यांनी केले.

Sindhudurga News: परप्रांतीयांच्या शेतजमीन खरेदीची SIT चौकशी; बावनकुळे यांचे स्पष्ट निर्देश

केवळ विकासासाठी काम करण्याचे आवाहन

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, निवडणुकीच्या काळात प्रा. मधु दंडवते आणि खासदार नारायण राणे यांच्यासोबतही माझे मतभेद नव्हते. आज आमदार निलेश राणे यांच्याशीही कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकारण बाजूला ठेवून ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण एकत्र काम करू, मानव संसाधन विकास, कृषी संशोधन केंद्र बांसारख्या संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करू. गोव्यापेक्षा सिंधुदुर्गचा पर्यटन विकास अधिक वाढवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू कोकणच्या मातीचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे, असे सुरेश प्रभू म्हणाले.

कोकणी उद्योजकांची जागतिक भरारी कौतुकास्पद! माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्ग जिल्हा आज पर्यटन जिल्हा म्हणून जगाच्या नकाशावर आला आहे. सुरेश प्रभू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांसोबत काम करतात, त्यामुळे त्यांचे जगातही महत्त्वाचे योगदान आहे. ‘प्रोजेक्ट संजीवनी’ सारख्या उपक्रमाचा फायदा थेट ग्रामीण जनतेल्ला होणार आहे. कुडाळ शहरात क्रीडा प्रबोधिनी आणि कुडाळ एमआयडीसीमध्ये क्रीडा प्रकल्प आणण्याचा आपला मानस आहे. त्यासाठी सुरेश प्रभू यांच्या साथीची गरज असल्याचेही आमदार राणे यांनी सांगितले, दरम्यान, ग्रामीण भागात वेळेवर आरोग्यसेवा पोहोचावी यासाठी मानव संसाधन विकास संस्थेने ‘प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत ही अॅम्बुलन्स सेवा सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांना तातडीची मदत मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Project sanjeevani ambulance launched by mla nilesh rane sindhudurga suresh prabhu news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Ambulance
  • nilesh rane
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

Sindhudurg Ganpati: २१ दिवस विराजमान होतो ‘अभिनवनगरचा राजा’; नवसाला पावणाऱ्या गणरायाची शेकडो वर्षांची परंपरा
1

Sindhudurg Ganpati: २१ दिवस विराजमान होतो ‘अभिनवनगरचा राजा’; नवसाला पावणाऱ्या गणरायाची शेकडो वर्षांची परंपरा

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश
2

Sindhudurg News :सिंधुदुर्गात पाणीटंचाईची शक्यता; वाड्या-वस्त्यांपासून धरण लाभक्षेत्राबाहेरील गावांसाठी नितेश राणेंचे मोठे निर्देश

Sindhudurg To Buy Fish : गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी
3

Sindhudurg To Buy Fish : गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
4

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.