Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ

Alphonso Mango: या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जाणे शक्य होणार असून, निर्यातीतील अडचणी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2026 | 03:03 PM
हापूस आंबा

हापूस आंबा

Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरी हापूसला मिळणार जागतिक बाजारपेठ
  • ‘मँगोनेट’ नोंदणीसाठी लवकरच मोहीम
  • हापूसला निर्यातीतील अडचणी होणार दूर
रत्नागिरी/ Alphonso Mango: जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी ‘मंगोनेट’ प्रणालीअंतर्गत नोंदणी वाढवण्यासाठी लवकरच विशेष मार्गदर्शन मोहीम राबवली जाणार आहे, अशी महत्त्वाची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी सभापती महेश नाटेकर यांनी दिली. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या अद्ययावत आंचा निर्यात केंद्राला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मंडळाने नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान झालेल्या सविस्तर अभ्यासानंतर आणि चर्चेनंतर जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादकांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडले जाणे शक्य होणार असून, निर्यातीतील अडचणी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. या अभ्यास दौऱ्यात कृषी सभापती महेश नाटेकर यांच्यासह गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, प्रवीण पांचाळ, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, संगमेश्वर पंचायत समिती सभापती शर्वरी वेळळे,  परिषद सदस्य प्रमोद निवळकर, कृषी अधिकारी अभिजित गडदे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या संयुक्त भेटीमुळे आंबा निर्यातीबाबतच्या समस्यांवर एकत्रितपणे तोडगा काढणे शक्य होणार आहे.

आंबा-काजू बागायतदारांना दिलासा! १५ दिवसांत मिळणार अवकाळीच्या नुकसानीची भरपाई, कृषीमंत्री काय म्हणाले?

तांत्रिक प्रक्रियेची दिली माहिती

लोकप्रतिनिधींनी आंबा निर्यातीसाठी आवश्यक विविध तांत्रिक आणि भौतिक प्रक्रियांची प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन पाहणी केली. आंब्याची शास्त्रोक्त प्रतवारी करणे, स्वच्छता राखणे, आधुनिक पंकिंग पद्धती आणि योग्य तापमान नियंत्रित साठवणूक था टप्यांचा समावेश होता, परदेशात, विशेषतः युरोप व आखाती देशांमध्ये आंबा पाठवण्यापूर्वी अनिवार्य मानल्या जाणाऱ्या ‘कोपर हिट ट्रीटमेंट’ आणि ‘इरेडिएशन’ या तांत्रिक प्रक्रियेची माहिती तज्ज्ञांकडून घेतली.

निर्यात केंद्राचे व्यवस्थापक अनिमेष पाटील व त्यांच्या पथकासोबत आयोजित बैठकीत पस्देशातील आंब्याची मागणी आणि तेथील कड़क निकष यावर सविस्तर चर्चा झाली. वाशी येथील केंद्राप्रमाणेच स्थानिक पातळीवर आवश्यक ते सर्व तांत्रिक मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ‘मॅगोनेट’ नोंदणी मोहिमेमुळे जागतिक निर्यातीचे निकष पूर्ण करणे व थेट परदेशी व्यापाऱ्यांशी संपर्क साधणे शेतक-यांना सौपे होणार आहे, लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या या संयुक्त पुढाकारामुळे रत्नागिरीतील जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे.

याड लागलं… लंडनपासून सौदी अरेबियापर्यंत, भारताच्या आंब्यांचं जगाला वेड; तोतापुरी, लंगडा, दशहरी यांचा बोलबाला

Web Title: Ratnagiri alphonso to gain access to global markets kokan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Global Market
  • kokan
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप
1

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;
2

Ratnagiri News: गावाकडच्या वाटा गजबजल्या! मुंबई-पुण्याहून लाखो भाविक कोकणात दाखल;

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?
3

Global Market Crash : नशीब… भारतातील शेअर बाजार आज बंद! शेजारील देशांच्या बाजारात हाहाःकार, काय नेमकी परिस्थिती?

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी
4

Ganeshostav 2026: गणेशोत्सवासाठी ‘रत्नागिरी नगरी’ सज्ज; बाप्पाच्या स्वागतासाठी पालिका प्रशासनाची जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.