Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: ग्राहकांनो…; रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी LPG बाबत केले ‘हे’ आवाहन

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी येथील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी गॅस साठी आलेल्या ग्राहकांची संवाद साधला.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 02:35 PM
Ratnagiri News: ग्राहकांनो…; रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी LPG बाबत केले ‘हे’ आवाहन
Follow Us
Follow Us:

रत्नागिरी जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला ग्राहकांशी संवाद 
जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करणार

रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्वच ग्राहकांना घरगुती गॅस चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसून येत असून रत्नागिरीतील गॅस वितरण एजन्सिज योग्य प्रकारे गॅस सिलिंडरचे वितरण करीत आहेत. गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्या बाबतच्या बातम्या निराधार असून आज रत्नागिरीतील विविध ठिकाणच्या गॅस सिलिंडर वितरण केंद्रांवरील गॅस सिलिंडरसाठीची गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले. गेल्या दोन तीन दिवसात सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या बातम्या काही माध्यमांवर पसरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

मात्र रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने अत्यंत कुशलतेने याबाबतची स्थिती हाताळली. आजही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी येथील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी गॅस साठी आलेल्या ग्राहकांची संवाद साधला. कोणत्याही प्रकारे गॅस सिलिंडरची टंचाई जिल्ह्यात नसल्याची आणि पुरेसा गॅस सिलिंडरचा साठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी जिंदल यांनी गॅस ग्राहकांना दिली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला.

४५ दिवसांनी सिलिडर मिळणार हे वृत्त चुकीचे आहे. २५ दिवसात घरगुती गॅसचा पुरवठा झाला पाहिजे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. बुकींगसाठी ग्राहकांनी व्हॉट्स अॅपचा वापर करावा. ग्राहकांनी अजिबात पॅनिक होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी जिंदल यांनी यावेळी गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनाला बुकींग संदर्भात माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना दिली.

Scam Alert: सावध राहा! LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम, एक चूक आणि रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट…

ग्राहकांचे येणारे फोन घेऊन, त्यांना समाधानकारक उत्तरे द्यावीत. त्यांच्या शंकांचे निरसन करावे. बुकींगची यादी कमी करण्याबाबत नियोजन करावे. ग्राहकांना २५ दिवसात गॅस सिलेंडर मिळाले पाहिजे, अशी सूचनाही दिली. माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, ग्राहकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, तहसिलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यात LPG Gas च्या काळाबाजाराबाबत एकही FIR नाही? मग सिलेंडरसाठी रांगा का?

LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम

ईरान आणि ईस्रात्रल-अमेरिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात तेल आणि गॅस टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम भारतातील घरांमध्ये, हॉटेल्स आणि खानावळीवर देखील होत असल्याचे पाहाला मिळत आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोकं जास्तीचे पैसे देऊन लवकरात लवकर गॅस सिलेंडर कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकांच्या याच अडचणींचा फायदा स्कॅमर्सनी घेतल आहे.

 

Web Title: Ratnagiri collector manuj jindal visit lpg gas storage and meet customers iran israel war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • LPG gas cylinder
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान
1

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू
2

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
3

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.