Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भेसळ करताय? मग सावधान! रत्नागिरीत FDA ची अस्वच्छता आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कडक मोहीम

अन्न प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रशासनाने शालेय पोषण आहाराबाबतही कडक भूमिका घेतली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2026 | 02:30 PM
भेसळ करताय? मग सावधान! रत्नागिरीत FDA ची अस्वच्छता आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कडक मोहीम
Follow Us
Follow Us:
  • रत्नागिरीत अनेक हॉटेल्स एफडीएच्या रडारवर
  • नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३२ आस्थापनांना नोटीस 
  • एफडीएची अन्न भेसळ व अस्वच्छतेविरोधात जोरदार धडक मोहीम 
रत्नागिरी: राज्यभरात अन आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) धडक कारवाई सुरू असताना, रत्नागिरी जिल्ह्यातही अन्न भेसळ, अस्वच्छता आणि बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कडक मोहीम उघडण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे या कारवाईमुळे अक्षरशः धाबे दणाणले आहेत. गेल्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात एफडीएने तब्बल १५० हून अधिक ठिकाणी अचानक छापेमारी केली आहे.

या धडक मोहिमेचा जबरदस्त धसका जिल्ह्यातील भेसळखोरांनी घेतला असून, आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया होणार असल्याची कुजबुज सुरू झाल्याने अनेक जण एफडीएच्या रडारवर आहेत. त्यामुळे नियमबाह्य काम करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.

दुधासह ब्रँडेड पनीरला वाढती पसंती, FDA च्या धडक कारवाईचा परिणाम; हॉटेलांमध्येही शुद्ध पनीरलाच मागणी

सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न प्रशासनाच्या पथकाने मार्चपासून जिल्ह्यात तब्बल १५१ ठिकाणी अचानक धाडी घातल्या आहेत. या तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे समोर आले. प्रशासनाने अस्वच्छता बाळगणाऱ्या आणि नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३२ आस्थापनांना तातडीने सुधारणा नोटीस बजावली आहे. याशिवाय, नियमांचे थेट उल्लंघन करणाऱ्या १५ आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत एकूण ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यामध्ये शहरातील एका प्रसिद्ध बिर्याणी सेंटरचाही समावेश असून अस्वच्छतेमुळे त्याच्यावर १३ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अन्न प्रशासनाने जिल्ह्यातील मिठाई व्यावसायिकांसाठी अत्यंत कडक नियमावली लागू केली आहे. यापुढे जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्ट चालकांना विक्रीसाठी ठेवलेल्या प्रत्येक मिठाईच्या डब्यावर किंवा ट्रेवर उत्पादन तारीख आणि एक्सपायरी तारीख दर्शवणारे लेबल लावणे सक्तीचे करण्यात आले आहे.

Konkan Railway मध्ये प्रवाशांचा ‘गेम’? हक्काच्या सीटवर अनधिकृत प्रवाशांची दादागिरी; TC ढुंकूनही पाहीना

या नियमाचे उल्लंघन झाल्यास कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. केवळ अन्नपदार्थच नव्हे, तर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा विक्रीवरही प्रशासनाने जोरदार प्रहार केला आहे. अन्न प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रशासनाने शालेय पोषण आहाराबाबतही कडक भूमिका घेतली आहे. शाळांमध्ये पोषण आहार तयार करताना २०२० च्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Fda take action against illegal hotels food stall adulteration in ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Raid
  • Ratnagiri
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
1

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ
2

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
3

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Tukaram Mundhe : विमलची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर होणार कारवाई, तुमच्यासाठी सुपरस्टार पण..
4

Tukaram Mundhe : विमलची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर होणार कारवाई, तुमच्यासाठी सुपरस्टार पण..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.