Scam Alert: सावध राहा! LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम, एक चूक आणि रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट...
Free Fire Max: प्लेअर्ससाठी सुरु झाला नवीन रिंग ईव्हेंट! मिड नाईट क्लोनसह मिळणार हे 5 धमाकेदार बंडल
ईरान आणि ईस्रात्रल-अमेरिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात तेल आणि गॅस टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम भारतातील घरांमध्ये, हॉटेल्स आणि खानावळीवर देखील होत असल्याचे पाहाला मिळत आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोकं जास्तीचे पैसे देऊन लवकरात लवकर गॅस सिलेंडर कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकांच्या याच अडचणींचा फायदा स्कॅमर्सनी घेतल आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, व्हॉट्सअॅप आणि एसएमएसवर स्कॅमर्स लोकांना गॅस डिलीव्हरीच्या नावाने खोटे मेसेज करत आहेत. गॅस एजेंसिच्या बाहेर असलेली गर्दी आणि मोठ्या रांगा यामुळे लोकं स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकत आहेत. अनेक लोकांच्या फोनवर व्हॉट्सअॅप आणि एसएमएसद्वारे ‘Pay Now, Get Gas Tomorrow’ असा एक मेसेज आला आहे. म्हणजेच आता पैसे भरा आणि उद्या गॅस सिलेंडर मिळवा. मेसेजमध्ये म्हटलं आहे की, आता पैसे भरल्यास उद्या लगेच गॅस सिलेंडर मिळेल. आधीच भारतात गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे.
लोकं जास्तीचे पैसे देऊन गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी तयार आहेत. अशातच स्कॅमर्सचा आलेला मेसेज लोकांची दिशाभूल करत आहे. लवकरात लवकर गॅस सिलेंडर मिळवण्याच्या हव्यासापोटी लोकं स्कॅमर्सवर विश्वास ठेवत आहेत आणि मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करत आहेत. ज्याक्षणी मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले जाते, त्यावेळी तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये जातात आणि तुमचं संपूर्ण बँक अकाऊंट रिकामं होतं.
iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी
सायबर एक्सपर्ट्स आणि गॅस कंपन्या इंडेन, भारत गॅस, एचपी गॅसने या स्कॅमबाबत अलर्ट जारी केला आहे. गॅस कंपन्यांनी सांगितलं आहे की, अधिकृत गॅस कंपन्या कधीही ग्राहकांना गॅस बुकींग करताना पेमेंट करण्यास सांगत नाही. त्यामुळे जर तुमच्या फोनवर लवकरात लवकर गॅस बुकींग आणि डिलीव्हरी करणारा कोणता मेसेज आला असेल तर सावध राहा. अशा मेसेजवर विश्वास ठेऊन नका. भारतातील तेल आणि गॅस टंचाईचा फायदा घेऊन स्कॅमर्स लोकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत.






