संगमेश्वरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ (फोटो- सोशल मिडिया)
दुसऱ्या दिवशी दुपारी मीना धोंडू सुवरे या नेहमीच्या सवयीप्रमाणे कोंबड्यांना बाहेर सोडण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडण्यास गेल्या. दरवाजा उघडताच आत कोंबड्याऐवजी बाहेर पडण्यासाठी व्याकुळ झालेला बिबट्या दबा धरून बसलेला दिसल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दरवाजा उघडताच बिबट्याने सुटकेसाठी थेट बाहेरच्या दिशेने भीषण झेप घेतली आणि जंगलाकडे पळ काढला.
या धावपळीत बिबट्याचे नख मीना याच्या चेहऱ्याला लागल्याने त्या जखमी झाल्या, सुदैवाने बिबट्याने पुन्हा हल्ला न केल्याने मीना सुवरे यांचा जीव थोडक्यात वाचला. घटनेनंतर जखमी मीना सुवरे यांना स्थानिकानी तातडीने फुणगुस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले, जिये डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार केले.
या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थ हादरून गेले असून संपूर्ण सुधरेवाडीत भीतीचे सावट पसरले आहे. गौढे व आडोशाच्या ठिकाणी वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून गस्त वाढवावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
कोकणातील काही जिल्ह्यात बिबट्यांनी चांगलीच दहशत माजविण्यास सुरुवात केली आहे. वारंवार बिबटे नागरी वस्तीत दिसू लागल्याने नागरिक भितीच्या छायेत वावरत आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या साडवली-सह्याद्री नगर परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (10 ऑक्टोबर) पहाटे परिसरातील स्थानिक नागरिक भाई शिंदे यांच्या घरासमोर बिबट्या फिरताना दिसला. हा संपूर्ण प्रकार घराबाहेर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी






