
रत्नागिरीमध्ये उपनगराध्यक्षासाठी युतीत वाटाघाटी
मंत्री उदय सामंत स्वतः निर्णय घेणार
सभापती वाटपाबाबत दोन्ही पक्षांत खलबते
रत्नागिरी: शिवसेना-भाजपा युतीने रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड निर्णायक विजय मिळवला, त्यानंतर आता युतीच्या नेत्यांमध्ये उपनगराध्यक्ष समित्यांच्या सभापती पद वाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या गटनेते पदाच्या निश्चितीचेही नियोजन पदासह केले जात आहे. भाजपला उपनगराध्यक्ष पदासह दोन समित्या मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक काळात पालकमंत्री उदय सामंत यांनी युती भक्कम असल्याचे दाखवून दिले. समित्या वाटपातही या भक्कमतेचे प्रतिबिंब उमटणार आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ३२ जागांपैकी २९ जागांवर विजय मिळाला. शिवसेनेला २३ आणि भाजपाला ६ जागा मिळाल्या.
मंत्री सामंतांचा प्रचारातही प्रत्यक्ष सहभाग
मेजॉरिटी असल्याने दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचा योग्य समन्वय रहावा यासाठी नगर परिषदेतील गटनेते लवकरच जाहीर होणार आहेत. या पाठोपाठ उपनगराध्यक्ष आणि समित्यांचे सभापती पद वाटप निक्षित होणार आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शिस्तबद्धतेच्या सूचना केल्या आहेत. रत्नागिरी नगर परिषदेमध्ये नियोजन, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम, महिला चालकल्याण आणि समाजकल्याण समित्यांसह स्थायी समिती सदस्य आहेत. यातील एक समिती उपनगराध्यक्षाकडे जाणार आहे.
Maharashtra Politics: भाकरी फिरणार अन् MVA तुटणार? ‘हा’ पक्ष बाहेर पडणार? तिसरी आघाडी…
सभापती वाटपाबाबत दोन्ही पक्षांत खलबते
नगरसेवक विजय सखेडेकर किया त्यांच्या सौभाग्यवती दैभवी खेडेकर यांच्याकडे राहणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यानी युतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी शिवसेनेसह भाजपाच्या उमेदवारांसाठी आवश्यक असणाऱ्या मदतीसह प्रत्यक्ष प्रचारातही भाग घेतला.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयोत्सव मिरवणुकीत शिद्रसेना-भाजपा युतीच्या नगरसेवकांसोबत भाग घेतला, युती भक्कम असल्याचा संदेश समिती सभापती वाटपातूनही देण्याची भूमिकासुद्धा मंत्री समत यांनी घेतली आहे, भाजपाच्या नेत्यांनी नवीन पदाधिकारी निश्चितीबाबत नियोजन केले जात आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या सभापती पदांसाठीही स्वतः पालकमंत्रीच निर्णय घेणार आहेत, त्यामुळे समिती सभापती वाटपाबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये राखलबते सुरू झाली आहेत.
Uday Samant : तुमची 40 वर्षांची सत्ता मोडून काढणार; उदय सामंतांची भाजपच्या नेत्यावर टीका
कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी तुटणार?
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप, नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील मतभेद तीव्र होत असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेगळा मार्ग स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महाविकास आघाडीतून बाहेर पडून तिसऱ्या आघाडीची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.