ओबीसी समाजाचा हैदराबाद गॅझेटला तीव्र विरोध (Photo Credit - X)
कुडाळ: मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून देण्यात आलेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आल्याची भावना व्यक्त करत, हे गॅझेट रद्द करावे या मागणीसाठी ओबीसी समाजाने कुडाळ येथे दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी
११ वाजल्यापासून हे आंदोलन कुडाळच्या जिजामाता चौकात सुरू केले आहे. ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आरक्षण मुळातच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, या हैदराबाद गॅझेटचा ओबीसी समाजाला तीव्र विरोध आहे.
आंदोलनाचा मुख्य उद्देश सरकारचे लक्ष वेधून घेणे आणि हे गॅझेट त्वरित रद्द करण्याची मागणी करणे हा आहे. या आंदोलनानंतर, ऑक्टोबर २०२५ मध्ये नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी एक महामोर्चा काढण्यात येणार आहे. कुडाळमधील हे आंदोलन त्याच महामोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर टांगती तलवार? GR वर हायकोर्टाचा मोठा निर्णय
या लाक्षणिक उपोषणात नितीन वाळके, सुनील भोगटे, हेमंत करंगुटकर, रमण वायगणकर, चंद्रशेखर उपरकर, नंदन वेंगुर्लेकर, अभय शिरसाट, राजन नाईक, काका कुडाळकर, समिल जळवी, रमेश हरमलकर, सदा अणावकर, आनंद मेस्त्री, रामा शिरसाट, विनायक अणावकर, सुनील दुबळे, संजय पडते, बोर्डेकर, विलास आरोलकर, शरद पावसकर, उदय मांजरेकर, अनुप नाईक, सुहास बांदेकर, शेखर जळवी, भरत आवळे, विकास वैद्य, राजू गवंडे, ऍड. विलास वेंगुर्लेकर, दीपक कोचरेकर, जयप्रकाश चमणकर, आनंद पाटकर, प्रसाद अरविंदेकर, अतुल बंगे, पपू शिरसाट, अजय शिरसाट, रमेश बोन्द्रे, बाळा बोर्डकर, आजगावकर, जोती जळवी, श्रेया गवंडे, भरत आवळे, संजय भोगटे, विनायक शिरसाट, राजू भोगटे, विजय पासकर, प्रभाकर चव्हाण, संजय पडते, जयेश जळवी, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.