फोटो सौजन्य- प्रतिनिधी
दिवाळीपासूनच देशभर पर्यटनाचा हंगाम सुरु झाला आहे. राज्यात काही दिवसांपासून थंडींचीही सुरुवात झाल्याने वातावरणही अतिशय चांगले आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन अजून जास्त प्रमाणात वाढता दिसत आहे. महाबळेश्वर, माथेरान या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्याशिवाय लोकांना मित्रपरिवार अथवा कुटुंबासहित कोकणातील किनाऱ्यावर राहण्याचा आनंद पर्यटकांना या काळात खुणावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील समुद्रकिनारेही शनिवार, रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी फुलले पाहायला मिळत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील प्रसिद्ध समुद्रकिनारे हे पर्यटकांचे नेहमीच आवडते ठिकाण आहेत. दरम्यान काही पर्यटकांकडून अतिउत्साहीपणा दाखवण्यात येतो आहे. जो त्यांनी आवरणे गरजेचे आहे.
अतिउत्साही पर्यटकांना कोणी आवरायचं? ग्रामस्थांसमोर प्रश्न
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत समुद्राला अमावस्याची जोरदार भरती असल्याने किनाऱ्यावर गाड्या भडगाव वेगाने फिरवत स्टंटबाजी करणाऱ्या अति उत्साही पर्यटकांच्या गाड्या कर्दे,मुरुड ,हर्णे ,पाळंदेआंजर्ले समुद्रकिनारी गाडी पाण्यात बुडण्याची घटना गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. एकाच दिवशी वेगवेगळ्या बीचवर तीन गाड्या समुद्रात बुडाल्यात त्यामुळे समुद्र किनाऱ्याची सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे अति उत्साही पर्यटकांना कोणी आवरायचं? असा कठीण प्रश्न ग्रामस्थांसामोर उभा राहिला आहे.
ग्रामस्थांच्या सूचनेला पर्यटकांकडून दाद दिली जात नाही.
दुपारी मुरुड समुद्र किनाऱ्यावर देखील चारचाकी गाड्यांचा स्टंट सुरू होताच तेवढी सक्षम यंत्रणा तालुक्यात नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून पाच वी घटना घडली आहे,किनारपट्टीवर अशा स्वरुपाच्या घटना या हंगामामध्ये वारंवार होऊ लागल्या आहेत. कर्दे, मुरुड, हर्णे, पाळंदे आणि आंजर्ले बीचवर सर्रास हे प्रकार होऊ लागले आहेत. या बीचवर गाडी घेऊन जाण्यास कोणीही आडकाठी करत नाहीत. मुरुड पाळंदे आणि हर्णे बीचवर सुरक्षारक्षक असतात परंतू त्यांचे पर्यटक ऐकत नाहीत. तसेच इतर बीचवर ग्रामस्थ जाऊ नका म्हणून ओरडत असतात त्यांना हे पर्यटक बिलकुल दादा देत नाहीत. आणि आता प्रत्येक आठवड्याच्या विकेंडला पर्यटकांची गर्दी ही होणारच आहे. आणि अशा गाड्या समुद्रात बुडण्याच्या घटना घडणारच आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
पर्यटन स्थळावर पार्किंगची व्यवस्था असावी आणि प्रशासनाचे लक्ष असावे
आंजर्ले किनाऱ्यावर बुडालेल्या गाडीला तेथील ग्रामस्थांनीच सहकार्य करून बाहेर काढले. अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेचीच जोड असणं गरजेचं आहे. तरच कुठे निभाव लागू शकतो. तसेच पर्यटन स्थळावर पार्किंगची व्यवस्था असणं देखील तितकेच गरजेचे आहे याकडे स्थानिक प्रशासनाने देखील लक्ष देणे गरजेचे आहे.अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.