Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेश नाईकांच्या ‘त्या’ विधानावर उदय सामंत यांचा थेट पलटवार; म्हणाले, शिंदेंनी उठाव केला नसता तर…”;

उदय सामंत यांनी गणेश नाईक यांना कडक इशारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाठराखण केली आहे. 'शिंदेंच्या उठावामुळेच तुम्हाला मंत्रीपद मिळाले' असे म्हणत सामंत यांनी नाईक यांना सुनावले

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 26, 2026 | 06:42 PM
गणेश नाईकांच्या 'त्या' विधानावर उदय सामंत यांचा थेट पलटवार (Photo Credit - X)

गणेश नाईकांच्या 'त्या' विधानावर उदय सामंत यांचा थेट पलटवार (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • गणेश नाईकांच्या ‘त्या’ विधानावर उदय सामंत यांचा थेट पलटवार
  • म्हणाले, “वय झालंय, भान ठेवा
  • शिंदेंनी उठाव केला नसता…”
Uday Samant on Ganesh Naik: महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी चांगले यश मिळवले त्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये काही ठिकाणी ठिणग्या उडताना दिसत आहेत. गणेश नाईक यांनी पु्न्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. अन् खळबळजनक विधान करत एकनाथ शिंदेंना डिवचलं. त्यानंतर शिवसेनेचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. आता, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना सामंत यांनी नाईक यांना प्रतिउत्तर देत थेट शब्दात इशार दिला आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

पत्रकार परिषदेत बोलताना उदय सामंत म्हणाले की, “गणेश नाईक सध्या भाजपच्या लाटेवर स्वार होऊन बोलत आहेत, परंतु त्यांनी बोलण्यापूर्वी स्वतःचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलग पाच वेळा न पडता निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या कर्तृत्वावर शंका घेण्यापूर्वी नाईक यांनी आपले वय आणि अनुभवाचे भान ठेवावे.”

कोकणकरांसाठी खुशखबर! दावोसमध्ये तब्बल ३ लाख कोटींचे करार; उदय सामंत यांची माहिती

“उठाव झाला नसता तर…”

सामंत यांनी नाईक यांना त्यांच्या मंत्रीपदाची आठवण करून देताना म्हटले, “महापौर कुठे झाला असता कुठे झाला नसता आणि नंतरचा प्रश्न, पण जर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला नसता आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले नसते, तर गणेश नाईक यांना मंत्रीपद देखील मिळाले नसते. केवळ टीआरपी वाढवण्यासाठी ते उपमुख्यमंत्र्यांवर उठसूट टीका करत आहेत. शिवसैनिक त्यांच्या वयाचा मान राखून सध्या शांत आहेत, मात्र यापुढे अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत. नेता म्हणून कोणाला आव्हान द्यायचे असेल तर सलग निवडून येण्याची ताकद लागते. हा माझा त्यांना सल्ला नाही, तर स्पष्ट सूचना आहे.”

गणेश नायक काय म्हटले होते?

ठाणे, कल्याणमध्ये कार्यकर्त्यांची शिवसेनेबरोबर युती झाल्यामुळे परवड झाली, अशी खंत भाजपचे नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केली. युती झाल्यामुळें वनमंत्री गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. ‘भाजपला जर खुली दिली असती तर भाजपाचा सर्व ठिकाणी महापौर सगळीकडे बसला असता.’ अशी भावना व्यक्त करून ठाण्यात येऊन गणेश नाईक यांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचले आहे. ‘भाजपाने परवानगी दिली तर यांचा नामोनिशान संपवेन.’, असे आवाहन देखील गणेश नाईक यांनी शिंदेंना दिले.

Ratnagiri ZP Election: रत्नागिरीचे जागा वाटप सुटणार? सामंत जिल्ह्यात ठाण मांडून, शिवसेना 45…

 

Web Title: Uday samant gives a direct response to ganesh naiks statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ganesh Naik
  • Uday Samant

संबंधित बातम्या

ZP Election 2026: ‘मिशन जिल्हा परिषद’साठी शिंदे मैदानात! महाबळेश्वरमधून प्रचाराचा शुभारंभ; ३ फेब्रुवारीपर्यंत सभांचा धडाका
1

ZP Election 2026: ‘मिशन जिल्हा परिषद’साठी शिंदे मैदानात! महाबळेश्वरमधून प्रचाराचा शुभारंभ; ३ फेब्रुवारीपर्यंत सभांचा धडाका

Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका
2

Sindhudurg : कुडाळ तालुक्यात शिंदे शिवसेनेचा ठाकरे गटाला मोठा दणका

अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर; मुंबईत होणार पक्षप्रवेश
3

अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर; मुंबईत होणार पक्षप्रवेश

Ganesh Naik News: ‘..तर शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकू’; गणेश नाईकांनी पुन्हा एकनाथ शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळलं
4

Ganesh Naik News: ‘..तर शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकू’; गणेश नाईकांनी पुन्हा एकनाथ शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.