रत्नागिरी जिल्हा परिषद (फोटो- सोशल मिडिया)
रत्नागिरीत शिवसेना 45 जागांवर ठाम
अजित पवारांच्या पक्षाला 2 जागा मिळण्याचा अंदाज
पालकमंत्री सामंत जिल्ह्यात ठाण मांडून
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत घेतलेल्या मॅरेथॉन बैठकीत शिवसेनेची व्यूहरचना स्पष्ट केली आहे. ५६ पैकी किमान ४५ जागांवर शिवसेना ठाम असून, भाजपला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला केवळ २ जागा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधीच्या निवडणुकीत अखंड शिवसेना असतानाही रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचीच मजबूत पकड होती.
पूर्ण बहुमतही शिवसेनेकडे याआधी होते. यावेळी त्याची पुनरावृत्ती होण्याची आशा शिंदे शिवसेनेला वाटते आहे. मात्र यावेळी अखंड शिवसेना नसून धनुष्यधारी शिंदे शिवसेनेला जिल्हा परिषदेत सत्तेत आणण्यासाठी राजकीय पावले उचलली जाताना दिसत आहेत. भाजपच्या वरिष्ठांकडून हे जागावाटप मान्य होण्याची शक्यता असली तरी भाजप मधील कार्यकर्त्यांमध्ये मात्र याबाबत असंतोष असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पालकमंत्र्यांचे रत्नागिरीत ठाण
संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागांवर सामावून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या ११२ जागांपैकी सुमारे ७५ जागांवर शिवसेनेने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील हरविरी, गावखडी आणि वाटद हे तीन गण भाजपला सोडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालकमंत्री सामंत यांनी नाणिज गणातून डॉ. पंकजा कांबळे यांची शिवसेनेच्या पहिल्या अधिकृत उमेदवार म्हणून आधीच घोषणा केली आहे. पालकमंत्री सामंत यांनी गुरुवारी रत्नागिरीत ठाण मांडून पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, तर दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन रणनीतीवर चर्चा केली. रवींद्र चव्हाण दोन दिवसांत रत्नागिरी दौऱ्यावर येत असून, त्यानंतर युतीची औपचारिक घोषणा आणि अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
Kolhapur ZP Election: 23 लाख कोल्हापूरकर ठरवणार उमेदवारांचे भविष्य; जिल्हा परिषद अन्…
जोरदार प्रति आव्हान
दुसरीकडे उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फेह महायुतीला जोरदार प्रति आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन दिवसात ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांची नावे जाहीर केल जातील, असे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरी आणि राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे निर्विवाव वर्चस्व असल्याने, या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या सर्व जागा शिवसेना लढवणार असल्याचे संकेत मिळाल् आहेत. येथे भाजपला एकही जागा सोडली जाणार नाही. तथापि गुहागरमध्ये ५ आणि संगमेश्वरमध्ये अशा एकूण ७ जागा भाजपल सोडण्याबाबत प्राथमिक सहमती झाली आहे.






