भाजप प्रदेशाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू; सांयकाळपर्यंत शिक्कामोर्तब
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरु झाली असून सायंकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. रवींद्र चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या संघटनात्मक बदलांसाठी ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Maharashtra Assembly Session : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी- विरोधकांचे आंदोलन
“भाजपमध्ये लोकशाही प्रक्रिया आहे… १२०० मंडळांच्या निवडणुकीनंतर, आम्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण केल्या आणि आता महाराष्ट्र भाजप अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे… महाराष्ट्रातील निवडणुकीचे प्रभारी असलेले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू देखील येथे उपस्थित आहेत… रवींद्र चव्हाण यांचे नामांकन दाखल झाले आहे… उद्या, संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, महाराष्ट्र भाजप अध्यक्षांचे नाव जाहीर केले जाईल. जर ते महाराष्ट्र भाजप अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार असतील तर त्यांचे नाव जाहीर केले जाईल; जर अधिक अर्ज आले तर निवडणुका होतील… रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात पक्ष नवी उंची गाठेल”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Marathwada Politics: ठाकरेंच्या गडाला सुरूंग; दोन बड्या नेत्यांचा उद्या भाजप प्रवेश निश्चित
हिंदी भाषेच्या वादावर फडणवीस म्हणाले, “आम्ही हिंदी भाषेच्या विरोधात नाही. आम्ही देशातील कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. जेव्हा ते (उद्धव ठाकरे) सत्तेत होते, तेव्हा त्यांनी हिंदी शिकवणे अनिवार्य केले होते, ज्याची शिफारस रघुनाथ माशेलकर समितीने केली होती. पलटूराम हे त्यांचं (उद्धव ठाकरे) योग्य नाव आहे. आम्ही एक समिती स्थापन केली आहे जी यावर अध्यन करून अहवाल सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्य सरकारने पहिलीपासून हिंदीबाबतटा जीआर रद्द केला. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडलं. “दोन भावांनी एकत्र येऊ नये असा जीआर मी काढलाय का? त्यांनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, जेवण करावं. आम्हाला काही फरक पडत नाही,” अशा शब्दांत फडणवीसांनी टोला लगावला आहे. मी कुणालाही एकत्र येण्यास कधीच रोखलं नाही. दोन भावांनी एकत्र येणं, खेळणं, गप्पा मारणं हा आमच्यासाठी विषयच नसल्याचं ते म्हणाले.