Receptionist girl brutally beaten up at Kalyan Nandivali Shree Bal Chikitsalaya news update
Kalyan receptionist beaten up : कल्याण : कल्याणमधील एका रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालयातील एका मराठी तरुणीला एका विक्षिप्त व्यक्तीने अमानुषपणे मारहाण केली आहे. तिच्या पोटावर थेट लाथ मारत आणि तिच्या केसांना धरुन ओढत नेत या तिच्यावर हल्ला केला. अंगावर काटा आणणारा या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कल्याणमध्ये खाजगी रुग्णालयमध्ये ही तरुणी रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यावेळी तिने डॉक्टरांची मिटिंग सुरु असल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या एका व्यक्तीने या तरुणीला अमानुषपणे मारहाण केली आहे. हा प्रकार हॉस्पीटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तरुणीला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव गोकुळ झा असे आहे. त्याच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गोकुळ झा याने नांदिवली परिसरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांची तातडीने भेट मागितली होती. मात्र रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असलेल्या तरुणीने डॉक्टर मीटिंगमध्ये आहेत. थोडावेळा थांबा असे सांगितले. हे ऐकून गोकुळ झा याने संतप्त होऊन सरळ तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. अत्यंत अमानुषपणे मारहाण करत तिला पोटामध्ये आणि छातीमध्ये लाथा मारल्या. तसेच तिचे केस ओढत तिला फरफडत बाहेर नेले. आरोपीचा राग अनावर होत त्याने तरुणीला अक्षरशः अमानुष मारहाण केली आहे. यावरुन आता सोशल मीडियावर जोरदार निषेध व्यक्त केला जात आहे. मारहाण होत असताना रुग्णालयामध्ये उपस्थित इतर लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी गौरव झा याने तरुणीला बेदम मारहाण केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ही मारहाणीची संपूर्ण घटना 21 जुलैच्या सायंकाळी घडली. नांदिवली परिसरातील श्री बाल चिकित्सालय” या रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसते की, तरुणाने प्रथम तरुणीला ढकलले, नंतर तोंडावर लाथ मारत तिला जमिनीवर फेकले आणि त्यानंतरही तिच्यावर लाथा-बुक्क्यांचा जोरदार मारा केला. हा प्रकार पाहून डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
नाशिकमध्ये डान्स क्लास न लावण्याने मुलीची आत्महत्या
नाशिकमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरामध्ये म्हसरूळ परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रंगाच्या भरात हार्पिक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आई वडिलांनी लगेच डान्सचा क्लास लावावा यासाठी मुलगी हट्ट करत होती. मात्र क्लास न लावून दिल्याने मुलीने विषारी हार्पिकचा सेवन करून आत्महत्या केली. मुलीवर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचार दरम्यान तिची प्राणज्योत मालवली आहे.