लक्ष्मण सावदी हे 2012 साली कर्नाटक विधानमंडळात अश्लील व्हिडिओ पाहत होते (फोटो - सोशल मीडिया)
Lakshman Savadi : कर्नाटक : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चर्चेमध्ये आले आहेत. माणिकराव कोकाटे हे नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जंगली रम्मी खेळताना दिसून आले. विरोधी नेत्यांनी याचा थेट व्हिडिओ जारी केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विधीमंडळाच्या कामकाजाच्यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी मंत्री गेम खेळत असल्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे. मात्र कर्नाटकच्या विधीमंडळामध्ये तर एक नेता हा सभागृहामध्ये थेट अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे दिसून आले होते.
कर्नाटक राज्याच्या विधीमंडळामध्ये हा प्रकार घडला होता. 2012 साली लक्ष्मण सावदी हे कर्नाटकच्या विधानसभेमध्ये मोबाईलमध्ये थेट अश्लील व्हिडिओ पाहताना आढळून आले होते. त्यांचा व्हिडिओ देखील समोर आला होता. लक्ष्मण सावदी यांच्या धक्कादायक व्हिडिओमुळे कर्नाटकच्या राजकारणामध्ये एकच गदारोळ निर्माण झाला होता. संपूर्ण देशामध्ये लक्ष्मण सावदी यांचे नाव चर्चेत आले होते. या घटनेनंतर लक्ष्मण सावदी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देखील दिला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणानंतर लक्ष्मण सावदी यांना भाजपने उपमुख्यमंत्री देखील बनवले होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लक्ष्मण सावदी हे 2012 साली कर्नाटकच्या विधानसभेमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे आढळून आले. त्यांनी पदाचा राजीनामा देखील दिला होता. त्यानंतर मात्र भाजपने त्यांना लक्ष्मण सावदी यांना उपमुख्यमंत्रिपद दिले होते. आता मात्र ते कॉंग्रेस पक्षामध्ये आहेत. एकेकाळी कर्नाटकच्या राजकारणामध्ये मोठा प्रभाव निर्माण करणारे लक्ष्मण सावदी हे त्यांच्या सभागृहातील गैर वर्तवणूकीमुळे चर्चेमध्ये आले होते. सध्या महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रम्मी गेम खेळल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. देशामध्ये शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर असताना कृषीमंत्री गेम खेळत असल्यामुळे सर्व स्तरातून रोष व्यक्त केला जात आहे. यानंतर आता माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार का यावरुन राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोण आहेत लक्ष्मण सावदी?
कर्नाटकच्या राजकारणामध्ये लक्ष्मण सावदी हे चर्चेत असणारे महत्त्वपूर्ण नेते आहेत. लक्ष्मण सावदी हे कर्नाटकच्या लिंगायत समाजातून येत असून ते प्रभावी नेते मानले जातात. बेलगावी जिल्ह्यातील अथणी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग तीन वेळा आमदारकी मिळवली होती. मात्र, 2018 च्या निवडणुकीत त्यांना याच मतदारसंघातून दोन हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. तरीही, मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. भाजपच्या कर्नाटकमधील ऑपरेसन लोटसमध्ये लक्ष्मण सावदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.