Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शवविच्छेदन करण्यास नकार!  वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

उरुळी कांचन येथील प्रकार

  • By Aparna
Updated On: Nov 26, 2023 | 04:56 PM
शवविच्छेदन करण्यास नकार!  वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Follow Us
Follow Us:

उरुळी कांचन : शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाने उरुळी कांचनला तातडीने दोन एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक केली आहे.
ताम्हणवाडी (ता.दौंड) येथील एका तरुणाचा बुधवारी (दि. २२) अपघाता मृत्यू झाला होता. त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह उरुळी कांचन येथे आणला असता, या ठिकाणी कामावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली लोखंडे यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन व माजी सदस्य संतोष कांचन यांनी त्यांना विनवणी करूनही त्यांनी ऐकले नाही. तसेच माझी शवविच्छेदन करण्याची मानसिकता नाही हे कारण देत नकार घंटा चालूच ठेवली. यानंतर ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे तक्रार करून प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावण्याचा इशारा देत वरिष्ठांचे लक्ष वेधले.

आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत उरुळी कांचन मार्गे पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली आणि या विषयाला वेगळे वळण मिळाले. अलंकार कांचन, संतोष कांचन, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप, किशोर मेमाणे, अभिषेक पवार आदींनी आरोग्य मंत्री सावंत यांची रस्त्यातच मेमाणे फार्म येथे भेट घेत त्यांच्या समोर या घटनेची वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर सावंत यांनी त्वरित पुण्यातील आरोग्य खात्याच्या वरिष्ठांना फोनवरच या काम टाळणाऱ्या महिला आरोग्य अधिकारी रुपाली लोखंडे यांची बदली करण्याचे आदेश दिले.

दोन एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक
उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने दोन एमबीबीएस डॉक्टर देण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. राजेश पाखरे आणि डॉ. मेहबूब लुकडे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश चव्हाण यांनी तातडीने काढले. या तडकाफडकी बदलीमुळे उरुळी कांचन परिसरामध्ये ग्रामस्थ, ग्रामपंचायत व पोलिस खात्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नवीन अधिकारी कामाचे कसे नियोजन व जनतेला सहकार्य करतात हे पाहणे गरजेचे आहे.

Web Title: Refusal to perform an autopsy medical officer transferred nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2023 | 04:56 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • pune news
  • Urali kanchan

संबंधित बातम्या

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
1

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
2

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली
4

Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! दीड लाखांचा खर्च करून पिकवलेली भेंडी रस्त्यावर फेकली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.