Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Munde on Ashadhi Wari: वारीत ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ची एन्ट्री! संशयित अन्नाचा २४ तासांत निकाल

आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील एकूण २० अन्न सुरक्षा अधिकारी वारीदरम्यान कार्यरत राहणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ९, तर इतर तीन जिल्ह्यांतील ११ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 18, 2026 | 04:16 PM
Tukaram Munde on Ashadhi Wari: वारीत ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ची एन्ट्री! संशयित अन्नाचा २४ तासांत निकाल
Follow Us
Follow Us:

Pandharpur news:  आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे येत असताना त्यांच्या ताटात शुद्ध, सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न पोहोचावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने यंदा अत्याधुनिक पाऊल उचलले आहे. पालखी सोहळ्यासोबत ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ ही अत्याधुनिक मोबाईल प्रयोगशाळा तैनात करण्यात आली असून, संशयित अन्नपदार्थांची तपासणी करून अवघ्या एका दिवसात अधिकृत अहवाल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भेसळखोरांवर तात्काळ कारवाई करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. सोलापूर जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील एकूण २० अन्न सुरक्षा अधिकारी वारीदरम्यान कार्यरत राहणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ९, तर इतर तीन जिल्ह्यांतील ११ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ या मोबाईल प्रयोगशाळेमुळे अन्नपदार्थांचे नमुने घटनास्थळीच तपासले जाणार आहेत. प्रयोगशाळेच्या दर्जाचा अहवाल अल्पावधीत उपलब्ध होत असल्याने भेसळ सिद्ध झाल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.

Sonam Wangchuk यांच्या प्रकृतीबाबत पत्नीचा गंभीर आरोप; सफदरजंग रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल देण्यास नकार

तक्रार करा; प्रशासन तत्काळ पोहोचणार

भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूषित पाणी किंवा निकृष्ट खाद्यपदार्थ आढळल्यास नागरिक आणि वारकऱ्यांनी तातडीने अन्न प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १८००-२२२-३६५ हा टोल-फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे.पालखीसोबत असलेली ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ व्हॅन सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यामुळे संशयित अन्नपदार्थांचे निदान तातडीने होईल. वारीसाठी २० अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत असून, नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त अन्न प्रशासन सोलापूर

वारीत आयुक्त तुकाराम मुंढे येणार?

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्याचीही चर्चा रंगू लागली आहे.पंढरपूर आणि आषाढी वारीशी विशेष भावनिक नाते आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पंढरपूर यात्रेच्या नियोजनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. वारकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या ६५ एकर वारकरी क्षेत्राच्या विकासाला गती देत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.याशिवाय चंद्रभागा नदी परिसरातील स्वच्छता, स्नानासाठी सुविधा, गर्दीचे प्रभावी नियोजन आणि वारकऱ्यांना सुरक्षित व सुलभ दर्शन व्यवस्था यासाठी त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यकाळात आषाढी वारीच्या व्यवस्थापनात शिस्त, नियोजन आणि पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला होता.

आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून ते पुन्हा आषाढी वारीत सहभागी होणार का, याकडे वारकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. त्यांच्या संभाव्य दौऱ्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी त्याबाबत उत्सुकता वाढली असून प्रशासनातील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CJP Protest: सोनम वांगचुक यांच्यानंतर आता अभिजीत दीपके यांची अनिश्चितकालीन उपोषणाची घोषणा!

पालखीसोबत ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ मोबाईल प्रयोगशाळा

संशयित अन्नपदार्थांचा २४ तासांत अधिकृत अहवाल

भेसळ सिद्ध झाल्यास तात्काळ कारवाई

वारीसाठी २० अन्न सुरक्षा अधिकारी तैनात

तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक : १८००-२२२-३६५

वारकऱ्यांना सुरक्षित व दर्जेदार अन्न देण्यावर प्रशासनाचा भर

 

Web Title: Regional news solapur pandharpur ashadhi wari food safety on wheels mobile lab tukaram mundhe visit updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • health care news
  • pandharpur
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ
1

पनीरच्या नावावरून देशभर चर्चा; FSSAIचा प्रस्ताव अन् तुकाराम मुंढेंच्या कारवाईला श्रेय देण्याची सोशल मीडियावर चढाओढ

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर
2

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
3

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.