Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारंवार गोष्टी विसरताय? सावध व्हा; मेंदू देतोय इशारा, अशी घ्या काळजी

Frequent Forgetting things Early Signs: विसराळूपणा अनेकदा सामान्य वाटत असला तरी वारंवार गोष्टी विसरण्यामागील कारणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. कारण अनेकदा हे डिमेन्शियासारख्या गंभीर मेंदूविकारांचे लक्षणही ठरू शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 17, 2026 | 05:24 PM
वारंवार गोष्टी विसरताय? सावध व्हा; मेंदू देतोय इशारा, अशी घ्या काळजी
Follow Us
Follow Us:
  • वारंवार गोष्टी विसरताय?
  • या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
  • स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी काय कराल?
वाढत्या धकाधकीच्या जीवनात विसराळूपणा सामान्य वाटत असला, तरी प्रत्येक वेळी तो निष्काळजीपणामुळेच होतो असे नाही. कधी कधी आपल्याला मोबाईल कुठे ठेवला, गॅस बंद केला का, पंखा बंद केला का किंवा एखाद्याचे नाव काय हे अचानक आठवत नाही. परंतु, अशा छोट्या गोष्टी विसरणे अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात. काही वेळा वारंवार गोष्टी विसरणे हे मानसिक ताण, अपुरी झोप किंवा स्मरणशक्तीशी संबंधित गंभीर आजाराचे सुरुवातीचे संकेत असू शकतात.तर, काही प्रकरणांमध्ये ते डिमेन्शिया किंवा इतर मेंदूशी संबंधित आजाराचे संकेतही असू शकतात. त्यामुळे या संकेतांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यामागील कारण जाणून घेणे गरजेचे आहे.

Water Intake: जास्त पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी वरदान आहे का? जाणून घ्या सत्य

फरक कसा ओळखाल?

अधूनमधून एखादे नाव, वस्तू किंवा भेटीची वेळ विसरणे ही सामान्य बाब आहे. मात्र, नुकतेच झालेल्या संभाषणाची आठवण न राहणे, एकाच प्रश्नाची वारंवार पुनरावृत्ती करणे किंवा ओळखीच्या ठिकाणी जाण्याचा रस्ता विसरणे ही चिंतेची बाब ठरू शकते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • वारंवार नुकत्याच घडलेल्या गोष्टी विसरणे.
  • रोजची साधी कामे पूर्ण करण्यात अडचण येणे.
  • वेळ, दिवस किंवा ठिकाणाबाबत गोंधळ होणे.
  • पैशांचे व्यवहार किंवा नियोजन करण्यात अडचण निर्माण होणे.
  • व्यक्तिमत्त्व किंवा वर्तनात अचानक बदल जाणवणे.
  • एकाच गोष्टीबद्दल वारंवार विचारणा करणे.

विसराळूपणामागील संभाव्य कारणे

सततचा ताण, अपुरी झोप, नैराश्य, व्हिटॅमिन बी-१२ची कमतरता, थायरॉईडचे विकार, काही औषधांचे दुष्परिणाम तसेच वाढते वय यांमुळेही स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य तपासणी करून मूळ कारण शोधणे महत्त्वाचे आहे.

स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी काय कराल?

दररोज पुरेशी झोप घ्या, संतुलित आहाराचे पालन करा, नियमित व्यायाम करा, मेंदूला चालना देणारे वाचन, कोडी सोडवणे किंवा नवीन कौशल्य शिकणे यांसारख्या सवयी जोपासा. तसेच, ताण कमी करण्यासाठी दररोज योगा, ध्यान आणि श्वसनाचे व्यायाम करणे फायदेशीर ठरतात.

अधूनमधून काहीवेळा गोष्टी विसरणे ही नैसर्गिक बाब असली, तरी विसराळूपणाचे प्रमाण वाढत असेल आणि त्याचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर संबधित डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास अनेक गंभीर आजारांचे निदान लवकर होऊ शकते आणि वेळीच योग्य उपचार केले जाऊ शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दररोजच्या ‘या’ चुका वाढवत आहेत ‘Bad Cholesterol’; हृदयासाठी ठरू शकतात धोकादायक

Web Title: Frequent forgetting memory loss symptoms brain health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • brain
  • health care news

संबंधित बातम्या

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ
1

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ

आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
2

आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.