Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दररोजच्या ‘या’ चुका वाढवत आहेत ‘Bad Cholesterol’; हृदयासाठी ठरू शकतात धोकादायक

Habits Causes Bad Cholesterol: दैनंदिन जीवनातील काही चुकीच्या सवयीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठी कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 16, 2026 | 07:38 PM
दररोजच्या ‘या’ चुका वाढवत आहेत ‘Bad Cholesterol’; हृदयासाठी ठरू शकतात धोकादायक
Follow Us
Follow Us:
  • या चुका वाढवत आहेत Bad Cholesterol
  • हृदयासाठी ठरू शकतात धोकादायक
  • लहान बदलाने होईल मोठा फायदा
उच्च कोलेस्ट्रॉल ही अशी समस्या आहे जी सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दाखवत नाही. मात्र, शरीरात ‘बॅड’ (LDL) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत गेल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचू लागते. यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. अनेकदा आपल्या दैनंदिन जीवनातील काही चुकीच्या सवयी नकळत कोलेस्ट्रॉल वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे. कोणत्या सवयींमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, जाणून घ्या.

Health Tips: ऑफिसमध्ये तासन्‌तास बसून काम? आजच फॉलो करा ‘या’ टिप्स; राहाल फिट अन् हेल्दी

अनियमित जेवणाची सवय टाळा

नाश्ता टाळणे, उशिरा जेवणे किंवा वेळेवर अन्न न घेणे याचा शरीराच्या चयापचयावर परिणाम होतो. त्यामुळे पुढील वेळी जास्त प्रमाणात अन्न खाल्ले जाते आणि तेलकट किंवा जंक फूडची निवड वाढते. परिणामी शरीरातील LDL कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका निर्माण होतो. नियमित वेळेत संतुलित आहार घेणे फायदेशीर ठरते.

प्रक्रिया केलेल्या अन्नाचे अतिसेवन

चिप्स, बिस्किटे, फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि साखरयुक्त पेये यामध्ये ट्रान्स फॅट, रिफाइंड कार्बोहायड्रेट आणि अतिरिक्त मीठ मोठ्या प्रमाणात असते. या पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास ‘बॅड’ कोलेस्ट्रॉल वाढते, तर ‘गुड’ (HDL) कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

बैठी जीवनशैली ठरते मोठे कारण

दिवसभर खुर्चीवर बसून काम करणे आणि नियमित व्यायामाचा अभाव यामुळे शरीरातील चरबीचे संतुलन बिघडते. दररोज किमान ३० ते ४० मिनिटे वेगाने चालणे, हलके व्यायाम सायकलिंग, योगा किंवा इतर शारीरिक हालचाली केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

अतिरिक्त साखरेकडेही लक्ष द्या

अनेक प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये लपलेली साखर असते. गोड पेये, मिठाई, बेकरी पदार्थ आणि फ्लेवर्ड स्नॅक्सचे जास्त सेवन केल्यास वजन वाढते, इन्सुलिन प्रतिकार वाढतो आणि त्याचा परिणाम कोलेस्ट्रॉलवरही होऊ शकतो. त्यामुळे साखरेचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

अपुरी झोप आणि तणावही कारणीभूत

दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप न मिळाल्यास आणि सतत तणावाखाली राहिल्यास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्यास तसेच हृदयविकाराचा धोका वाढण्यास मदत होऊ शकते. ध्यान, योग आणि पुरेशी विश्रांती यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

लहान बदलाने होईल मोठा फायदा

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कठोर उपायांची नेहमीच गरज नसते. संतुलित आहार, नियमित व्यायाम, वेळेवर जेवण, प्रक्रिया केलेल्या अन्नाचे मर्यादित सेवन, पुरेशी झोप आणि तणावावर नियंत्रण या छोट्या सवयी दीर्घकाळ हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. नियमित आरोग्य तपासणी करून कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सततचा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास? दुर्लक्ष करू नका; हृदयविकाराचे असू शकतात संकेत

Web Title: Bad cholesterol causes daily habits increase ldl cholesterol heart health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • health care news

संबंधित बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…
1

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा; रुग्णांचे आरोग्य धोक्यात, सुविधा मिळवण्यासाठी…

LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?
2

LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ
3

Kidney-Liver Transplant : शासकीय रुग्णालयांत प्रत्यारोपण सुविधा वाढवा – हसन मुश्रीफ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.