Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: शेतकऱ्यांसाठी दिलासा! खरीप हंगामासाठी खतांचा मुबलक साठा उपलब्ध

जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांमध्ये युरिया, डीएपी, एमओपी, सुपर फॉस्फेट (एसएसपी) आणि संयुक्त खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 24, 2026 | 04:26 PM
Satara News,Kharif 2026, Fertilizers, Farming News, Agriculture,

Satara News,Kharif 2026, Fertilizers, Farming News, Agriculture,

Follow Us
Close
Follow Us:
  • साताऱ्यात  रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध
  • सर्व कृषि सेवा केंद्रांमध्ये युरिया, डीएपी, एमओपी, सुपर फॉस्फेट (एसएसपी) आणि संयुक्त खतांचा मुबलक साठा उपलब्ध
  • एखाद्या विशिष्ट खतावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन
 

Satara Agricultural News: खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून आगामी काळात कोणतीही टंचाई भासणार नाही, अशी खात्री जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकरी निर्धास्तपणे नियोजन करू शकणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांमध्ये युरिया, डीएपी, एमओपी, सुपर फॉस्फेट (एसएसपी) आणि संयुक्त खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. मार्च २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ५७,९९० मेट्रिक टन खतसाठा विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये युरिया १२,०७८ मे. टन, डीएपी ६,१९० मे. टन, एमओपी ३,७९१ मे. टन, सुपर फॉस्फेट ८,९४८ मे. टन आणि संयुक्त खते २६,९८३ मे. टन इतका साठा आहे.

आमदार गायकवाडांचे विधान गुन्हेगारी स्वरुपाचे, फडणवीस यांच्यात हिम्मत असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांचे आव्हान

याशिवाय, खरीप हंगाम २०२६ साठी सातारा जिल्ह्याला एकूण १,०२,३०० मेट्रिक टन खत पुरवठ्याचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये युरिया ३८,२०० मे. टन, डीएपी ९,८०० मे. टन, एमओपी ४,२०० मे. टन, सुपर फॉस्फेट ११,८०० मे. टन आणि संयुक्त खते ३८,३०० मे. टन इतक्या खतांचा समावेश आहे. खतांचे सुरळीत वितरण करण्यासाठी संबंधित कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, एखाद्या विशिष्ट खतावर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करावा. माती परीक्षण करून जमिनीच्या गरजेनुसार योग्य खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल आणि जमिनीचा पोतही सुधारेल.

मुंबईतील प्रदूषण मोजणी प्रकल्प ठप्प; ५ कोटींचे टेंडर रद्द, एअर क्वालिटी मॉनिटरिंग व्हॅन खरेदीला ब्रेक

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रांची नियमित तपासणी सुरू असून खतांची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. जर कोणी खतांची जादा दराने विक्री, अनधिकृत साठेबाजी, खतांचे लिकिंग किंवा औद्योगिक वापर करताना आढळले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे.

 

Web Title: Relief for satara farmers adequate supply of chemical fertilizers assured for kharif season 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • agriculture
  • Satara News
  • Satara Zilla Parishad

संबंधित बातम्या

साताऱ्यात एनसीईआरटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; वृषालीराजे भोसलेंनी केलं मोर्चाचे नेतृत्त्व
1

साताऱ्यात एनसीईआरटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; वृषालीराजे भोसलेंनी केलं मोर्चाचे नेतृत्त्व

म्हसवड पालिकेचा अजब कारभार; व्यापारी गाळे विनाभाडे, लिलाव मात्र रखडले
2

म्हसवड पालिकेचा अजब कारभार; व्यापारी गाळे विनाभाडे, लिलाव मात्र रखडले

भक्तीच्या महापुरात न्हाली मोहोळ नगरी; गुरू-शिष्य भेट अन् खर्गे महाराजांकडून ‘ही’ भाकणूक
3

भक्तीच्या महापुरात न्हाली मोहोळ नगरी; गुरू-शिष्य भेट अन् खर्गे महाराजांकडून ‘ही’ भाकणूक

Water Issue News: शाहूपुरीतील पाणीपुरवठा पिवळसर! दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात? जाणून घ्या उपाययोजना
4

Water Issue News: शाहूपुरीतील पाणीपुरवठा पिवळसर! दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात? जाणून घ्या उपाययोजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.