Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरक्षण ही काही खिरापत नाही; जरांगेंच्या टीकेला हाकेंचे प्रत्युत्तर

मनोज जरांगे यांना मंडल आयोग आणि ओबीसींबाबत काहीच माहिती नाही. राज्य मागासवर्गीय आयोग संपूर्ण अभ्यांस केल्यानंतरच एखाद्या जातीचा समावेश करतो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 23, 2024 | 03:54 PM
सौजन्य- सोशल मिडीया

सौजन्य- सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : आरक्षण ही काही खिरापत नाही, ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट महाराष्ट्रात घातला जातो आहे. कुणबी प्रवर्ग हा वेगळा प्रवर्ग आहे  फक्त कुणबी नोंदी असतील तर त्यांना आरक्षण देण्यापासून कुणी रोखू शकत नाही, पण मराठा कुणबी आणि कुणबी मराठा शोध लावून महाराष्ट्रात प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे, अशा शब्दांत ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंना प्रत्युत्तर दिले आहे.

ज्यांच्या कायदेशीर नोंदींही नाहीत त्यांनाही आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे घटनेने दिलेले १६ टक्के आरक्षण रद्द करा, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर हाकेंनी जरांगेंवर पलटवार करत त्यांना उत्तर दिले आहे. ‘कुणबी हा वेगळा प्रकार आहे. खान्देशी कुणबी, काळे कुणबी, वऱ्हाडी कुणबी, कोकणी कुणबी, तलेरी कुणबी, खैरे कुणबी, घाटोळे कुणबी. हे खरे कुणबी आहेत आणि त्यांचे सर्व रीतिरिवाज वेगवेगळे आहेत. हे कुणबी मराठा समाजाच्या व्यतिरिक्त आहेत. पण ‘कुणबी’ या एक घेऊन ज्या गोष्टी सुरू आहेत त्या सर्व चुकीच्या आहेत.

मनोज जरांगे यांना मंडल आयोग आणि ओबीसींबाबत काहीच माहिती नाही. राज्य मागासवर्गीय आयोग संपूर्ण अभ्यांस केल्यानंतरच एखाद्या जातीचा समावेश करतो. मागासवर्गाला तो अधिकार आहे. मराठा समाजातील तरुणांना माझी विनंती आहे की जर प्रगती करायची असेल, चांगलं जीवन जगायचं असेल आरक्षण हा एकमेव पर्याय नाही.

आरक्षण हे खिरापत वाटण्याचा, आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम नाही, आता दहा टक्के दिलेले आरक्षणातील सर्वेक्षण १०० टक्के बोगस आहे, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेनी यावेळी केला.  कोणीतरी माणूस उठतो आणि वेठीस धरतो आणि सरकारही जरांगेंना एंटरटेन करत आहे. ओबीसी आरक्षणात अशाच जाती घातल्या, ओबीसी असेच आले, त्यांचे कुठले सर्वेक्षण झालेले नाही, अशी वक्तव्ये कुठल्याच नेत्याने करू नये,” असे आवाहन हाकेंनी  केले.

कुणबी नोंदींची श्वेत पत्रिका दाखल करा. जरांगेंच्या स्टेटमेंटने ओबीसींच्या मनात भिती निर्माण होणार नाही का? मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत नाही. संविधानाने बोलतो. जरांगे यांच्या मागणीचा हेतू राजकीय असू शकतो. 288 विधानसभा लढवून काय करणार, तुमचे आमदार कमी आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title: Reservation is not a gift hakes response to jarangs criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • Lakshaman Hake
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • OBC Reservation
  • political news

संबंधित बातम्या

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची  मोठी मागणी
1

Arvind Sawant : ‘रेल्वे विभागाचा कोकणावर अन्याय’; खासदार अरविंद सावंत यांची मोठी मागणी

Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकीमध्ये AIMIM ची एन्ट्री; असदुद्दीन ओवैसीनी साधला काँग्रेस अन् भाजपवर निशाणा
2

Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकीमध्ये AIMIM ची एन्ट्री; असदुद्दीन ओवैसीनी साधला काँग्रेस अन् भाजपवर निशाणा

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?
3

Kerala Political News : केरळमध्ये भाजपची ‘अग्निपरीक्षा’! कमळ फुलणार की मागे पडणार?

Chadha Demands Paternity Leave : नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी
4

Chadha Demands Paternity Leave : नवजात बाळाला सांभाळण्याची वडीलांचीही जबाबदारी; राघव चड्ढांनी केली पितृत्व सुट्टीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.