मुंबई : भाजपच्या सहकाऱ्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होत आहे. हा आनंदाचा दिवस असून तो साजरा करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अवमान होईल, अशी कोणतीही वाक्य येता कामा नयेत, अशी सूचना भाजप नेत्यांनी आपल्या इतर नेत्यांना द्यावी, अशी अपेक्षा दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
काल 29 जून रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. आज सकाळी एकनाथ शिंदे यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी राजभवन येथे त्यांनी सरकार स्थापनेचे पत्र दिले.
[read_also content=”महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर खासदार अमोल कोल्हे यांच ट्विट, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/mp-amol-kolhes-tweet-on-power-struggle-in-maharashtra-said-nrdm-299141.html”]
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.