Rickshaw drivers to go on statewide strike on May 21 against e-bike taxis
मुंबई : राज्यामध्ये रिक्षाचालकांचे राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे ही बंदची हाक देण्यात आली आहे. येत्या 21 मे रोजी रिक्षाचालकांकडून हे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्या आला आहे. रिक्षा चालकांचे हे आंदोलन ई- बाईक टॅक्सीच्या विरोधामध्ये असणार आहे.
रिक्षा चालकांनी राज्यव्यापी बंदची हाक देत मोठं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षा चालकांच्या व्यवसायावर आंदोलन ई- बाईक टॅक्सीमुळे मोठा परिणाम होत आहे. यामुळे त्यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे राज्यामध्ये ई- बाईक टॅक्सी बंद करण्यात यावी अशी मागणी रिक्षा चालकांकडून केली जात आहे. ई- बाईक टॅक्सीला (E-Bike Taxi) महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचा तीव्र विरोध दर्शवला असून या निर्णयविरोधात राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (RTO) 21 मे रोजी निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ई-बाईक टॅक्सीमुळे 15 लाख रिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. शासनाने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याआधी संघटनेबरोबर चर्चा करणे आवश्यक होतं, अशी मागणी संघटनेने केली आहे. यामुळे आता रिक्षा चालकांनी आक्रमक पवित्रा घेऊन राज्य सरकार विरोधात आवाज उठवला आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शहरे आणि ग्रामिण विभागातील ऑटोरिक्षा संघटनांचे सर्व प्रमुखांची बैठक 27 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या बैठकीत राज्य शासनाच्या या अन्यायकारक निर्णया विरोधात दि. 21 मे 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या निर्णयाचा फटका सर्वसामान्य प्रवाश्यांना बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रशासन या बाबत नेमकं काय पाऊले उचलतं हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
RTO समोर करणार निदर्शने
रिक्षा संघटनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजूरी तातडीने रद्द करण्यात यावी. बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी देण्यासाठी राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. मात्र यामुळे रिक्षा चालकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच याबाबत झालेल्या बैठकीमध्ये रिक्षा चालकांचा विचार करण्यात आला नाही. मात्र तरी देखील परवानगी दिल्यामुळे 21 मे रोजी रिक्षा चालक आंदोलन करणार आहेत. ई-बाईक टॅक्सी /बाईक पुलींग सुरू झाल्यास महाराष्ट्रातील 15 लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात येणार आहे. यामुळे रिक्षा संघटनांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत.